"फ्युजन" नागपूरच्या छापखाना ग्रुपचे किस्मत आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन


"फ्युजन" 

 नागपुरातील कलाकारांचा छापखाना नावाचा ग्रुप गेल्या दहा वर्षापासून दृश्य कलेमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असून विविध ठिकाणी त्याच्या कार्यशाळा घेऊन प्रदर्शनी भरवत आहे. यावर्षी छापखान्याला दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त या ग्रुपने मागील एक महिन्यापासून या ग्रुप मध्ये असलेल्या सर्व चित्रकारांच्या कलाकृतींची एकल प्रदर्शनी मुंबईच्या किस्मत आर्ट गॅलरीमध्ये आयोजित केली होती. विविध शैलीमध्ये व विविध माध्यमातून काम करणाऱ्या या ग्रुपमधील चित्रकारांच्या प्रदर्शनीला उस्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे. याचाच एक भाग म्हणून या ग्रुपने समूह चित्र प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे आणि या समूह प्रदर्शनाचे  उद्घाटन येत्या २५ फेब्रुवारी २०२५ ला होणार आहे. 


या दहा वर्षाच्या काळात छापखान्याने कलेच्या क्षेत्रात प्रयोगशील काम केले आहे. प्रिंट, निसर्ग चित्र, टेराकोटा, तसेच स्क्रॅप- मेटल वर्कशॉप, इन्स्टॉलेशन, असेंबलांज अशा प्रयोगशील माध्यमात सुद्धा या कलाकारांनी प्रदर्शना भरवली आहे. या प्रकारे कलेला नवीन आयाम व दिशा दाखवण्याचे या ग्रुपच्या माध्यमातून सतत सुरू आहे. 

या ग्रुपचे महत्त्वाचे कलाकार मिलिंद लिंबेकर यांच्या माध्यमातून या ग्रुपची स्थापना करण्यात आली. लिंबेकर हे आज भारतात आर्ट कलेक्टर, चित्रकार आणि आर्टक्युरेटर म्हणून नावारूपाला आहेत. त्यांचे भारतातील अनेक ठिकाणी चित्र प्रदर्शन सुद्धा झालेत.आज त्यांचे चित्र ऑकशन मध्ये सुद्धा पोहचली.  सदानंद चौधरी  नागपूर विद्यापीठात ललित कला विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते मुखवटा या विषयावर चित्रनिर्मिती करत आहे. मनुष्य आणि मुखवटा यांचा  आंतरबाह्य संबंध त्यांच्या चित्रांमधून स्पष्टपणे जाणवतो. 

वीरेंद्र चोपडे हे मुंबईच्या जेके अकाडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन मुंबई येथे कलेचे प्राध्यापक आहेत. त्यांची चित्र ही मनाला मोहित करणारी असून सपाट रंगलेपणाच्या माध्यमातून चित्रात सहज सुंदरता दिसते. अगदी साधी सहज पद्धत पण चित्रातील अर्थपूर्ण आशय ही त्यांच्या चित्राची ताकद आहे. गुलजार यांचे एकल चित्र प्रदर्शन खूप गाजले. चंद्रशेखर तांडेकर हे नागपूरच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्राध्यापक असून ते चित्रकला व प्रिंट या माध्यमातून अतिशय प्रयोगशील आणि सर्जनशील कार्य करत आहे. नुकतेच त्यांच्या चित्रांचे दुबई येथे  प्रदर्शनी झाले. अभिषेक चौरसिया हे नागपूरच्या शाळेमध्ये कलाशिक्षक असून त्यांच्या चित्रात लोककला शैलीचा प्रभाव प्रामुख्याने जाणवतो. लोककलेतील चिन्हांचा चित्रामध्ये आगळ्यावेगळ्या शैलीमध्ये वापर हे त्यांच्या चित्रशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रिंट माध्यम आणि चित्र माध्यम यांचा सुरेल संगम त्यांच्या चित्रामध्ये दिसून येतो. 

मौकतीक काटे हे शिल्पकार असून शिल्पकलेच्या भारतभर अनेक कार्यशाळान मध्ये त्यांनी सहभाग घेतला असून भारतातल्या अनेक शहरांमध्ये त्यांची शिल्प पाहायला मिळतात. शिल्पकलेच्या विविध माध्यमांमध्ये त्यांनी काम केले असून दगड या माध्यमांमध्ये शिल्प घडविण्यात त्यांना रुची आहे. मिलिंद अटकले हे शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्राध्यापक असून प्रिंट माध्यमात त्यांनी अनेक प्रयोग करून प्रिंट घेतलेल्या आहे. अक्षय तिजारे हे नवोदित प्रिंट मेकर असून त्यांनीही प्रिंटमध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत.लिथोग्राफी असो ईचिंग असो किंवा वूड कट असो या माध्यमांमध्ये प्रयोग करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रिंट कशी घेता येईल हे त्यांच्या प्रिंट चे खास वैशिष्ट्य आहे. 

छापखाना या समूहाचे कला प्रदर्शन दिनांक 25 फेब्रुवारी ते 03 मार्च 2025 सकाळी 11 ते संध्याकाळी 7या वेळेत किस्मत आर्ट गॅलरी, थर्ड पास्ता लेन, कोलाबा, येथे सुरू राहील.
९ समकालीन कलाकारांच्या कलाकृतीचे प्रदर्शन 

स्थळ: किस्मत आर्ट गॅलरी, कुलाबा, मुंबई.*
कालावधी :२५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२५
सकाळी : ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत 

 सहभागी कलाकार:
 मिलिंद लिंबेकर,
सदानंद चौधरी, अभिषेक चौरसिया, शेखर तांडेकर,
मौक्तिक काटे, विनोद चाचेरे,
मिलिंद अटकले,
अक्षय तिजारे, वीरेंद्र चोपडे



जहांगीर आर्ट गॅलरीत "माँक्स” - लिजेंड्स अँड ट्रॅडिशन्स हे विजय कियावत यांच्या चित्रांचे एकल चित्र प्रदर्शन


चित्रकार: विजय कियावत

पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार विजय कियावत यांच्या जलरंगात निर्मिलेल्या अनोख्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडा मुंबई ४००००१ येथे २४ फेब्रुवारी ते  मार्च २०२५ ह्या दरम्यान भरणार आहेसर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  या वेळेत विनामूल्य बघता येईलह्या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली चित्रे 'माँक्स’-लिजेंड्स अँड ट्रॅडिशन्सह्या संकल्पनेवर आधारित असून त्यात प्रामुख्याने भिक्षू आणि त्यांची पारंपारिक भव्यता  त्यांच्याशी निगडित विविध रूढी यांचा समावेश आहे.

 


विजय कियावत यांनी IIT मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर सुमारे चार दशके कॉर्पोरेट CEO म्हणून नामवंत कंपन्यातून काम केलेदिल्लीतील भव्यदिव्य उद्यानेनिसर्गातील विविध ऋतूतील चमत्कृतीझाडेफुलेवनस्पती  त्यापासून दरवळणारा सुवास वगैरेंनी त्यांना प्रभावित केलेतसेच मनिष पुष्कलेवसुंधरा तिवारी ब्रूटासुरिंदर कौरराजेश शर्मा ह्या दिल्लीतील नामवंत कलाकारांकडून  कॅलिफोर्निया बर्कले येथील जुली कॉहन  नाफासिंगापूर येथील रेमंड याप यांकडून त्यांना बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ झालात्यांनी मुंबईनवी दिल्लीसिंगापूरलंडनअमेरिका येथे अनेक एकल  सामूहिक प्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे ठेवलीतत्यांच्या चित्रांचा २०१४ मध्ये इंडिया हॅबिटॅट सेंटरनवी दिल्ली यांच्या वार्षिक मासिकात सन्माननीय समावेश करण्यात आलात्यांनी अनेक कलाविषयक उपक्रमातून आर्ट कॅम्पस् ,वर्कशॉप वगैरेच्या माध्यमातून चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले आहेAIFACS  Camlin यांच्यातर्फे आयोजित  राष्ट्रीय चित्रप्रदर्शनातून त्यांनी आपली चित्रे ठेवली होतीसाहित्य कलापरिषद ह्या दिल्ली सरकारतर्फे आयोजित साहित्यिक उपक्रमात त्यांनी भाग घेतला  त्यांच्यातर्फे त्यांचा सन्माननीय सदस्य म्हणून गौरविण्यात आलेत्यांच्या चित्रांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे  भारतातील आणि विदेशातील अनेक मान्यवर संग्राहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत.'अष्टगुरुह्या मुंबईतील कलाप्रवर्तक संस्थेतर्फे त्यांचे  चित्र ऑक्टोबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय लिलावात विकले गेले.


 

प्रस्तुत चित्रप्रदर्शनात त्यांनी बौद्धभिक्षू  त्यांची पारंपारिक भव्यता  त्यांच्याशी निगडित धार्मिक रितीरिवाज ह्यावर आधारित जलरंगात कलात्मकतेने नटविलेली आपली वैविध्यपूर्ण चित्रे ठेवली आहेतत्यांच्या चित्रांमध्ये मुख्यतः निसर्गाविषयी उत्कट प्रेमसकारात्मक आणि विविध धार्मिक रूढी  परंपरा तसेच त्यातील रीतीरिवाज यांचे अभूतपूर्व दर्शन सर्वांना घडतेसाहित्याचा अभ्यास कलात्मकता प्रवासातील अनुभव  त्यावर आधारित संकल्पना तत्त्वज्ञान ऐतिहासिक परंपरा  भारताचा गौरवपूर्ण पूर्व इतिहास आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना यांचे उत्कट  मनोज्ञदर्शन त्यांच्या चित्रांमध्ये सर्वांना घडते  प्रभावित करतेबौद्ध भिक्षूंच्या धार्मिक संकल्पनारूढी परंपराधर्मप्रसारासाठी त्यांचे अविरत होणारे प्रयत्नआत्मिक शांततापूर्ण संकल्पनातून साकारणाऱ्या संवेदना आणि त्या उत्कट रंगलेपणातून  प्रतिकात्मक निवेदनातून सर्वांना आकर्षित करणारी प्रभावशाली  बोलकी चित्रशैली ह्या सर्वांच्या समावेशामुळे ही चित्रसंपदा सर्व रसिकांशी सुसंवाद साधते.


चित्रकार: विजय कियावत

प्रदर्शन: "माँक्स - लिजेंड्स अँड  ट्रॅडिशन्स"                                          स्थळ:जहांगीर कलादालनकाळा घोडा मुंबई                               

कालावधी२४ फेब्रुवारी ते  मार्च २०२५                                            वेळसकाळी ११ ते संध्याकाळी  या वेळेत                                    अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९८१००३८२१२




 

जहांगीर आर्ट गॅलरीत डॉ. मोहन लुथरा यांचे 'होम अँड अब्रॉड' हे एकल चित्र प्रदर्शन I १७ ते २३ फेब्रुवारी २०२५

 डॉमोहन लुथरा यांचे 'होम अँड अब्रॉड' – दृश्यविचार आणि कविता यांचा प्रवास

चित्रकारडॉमोहन लुथरा

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी लंडनस्थित कलाकार डॉमोहन लुथरा यांच्या होम अँड अब्रॉड –  पेंटिंग अँड  थॉट या नव्या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहेहे प्रदर्शन १७ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत चालणार असूनस्थानस्मृती आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा संवाद प्रेक्षकांसमोर मांडतो.

डॉलुथरा यांनी अनेक दशके लंडनमध्ये प्रशासकीय सेवा आणि कला यांचा समतोल राखत चित्रकला आणि शिल्पकलेत आपली आवड जोपासली आहेअलीकडच्या काळातते हिवाळा गोवा आणि वडोदरा येथे घालवतातजिथे ते स्टुडिओ शेअर करतात आणि आपल्या कलासाधनेत रमलेले असतातत्यांचे कार्य सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिबिंब दर्शवतेइतिहासपर्यावरण आणि ओळख यांच्यावर विचारमंथन करणारे आहे.





'होम अँड अब्रॉडया प्रदर्शनाची खासियत म्हणजे प्रत्येक चित्रासोबत डॉलुथरा यांनी स्वतः लिहिलेली काव्यात्मक ओळ किंवा कथा आहेहे काव्य त्यांच्या कलाकृतींना अधिक सखोल अर्थ प्रदान करते आणि एक अनोखा दृश्य-साहित्यिक अनुभव तयार करतेत्यांच्या कविता केवळ दृश्यांचे वर्णन करत नाहीततर त्या कालपरिवर्तन आणि मानवी जडणघडणीवर चिंतन करतात.

या प्रदर्शनात विविध 'स्केप्स'लँडस्केप्ससिटीस्केप्स आणि वेस्टस्केप्स यांचा समावेश आहेत्यांच्या चित्रांमध्ये ताजमहालसेंट पॉल्स कॅथेड्रलव्हेनिसची कालवे आणि रिचमंड ब्रिज यांसारखी प्रतिष्ठित स्थळे दिसतातमात्रया सौंदर्याच्या पलिकडेही त्या स्थळांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय संदर्भांचा वेध घेतला आहेउदाहरणार्थताजमहाल हे शाश्वत प्रेमाचे प्रतीक असलेतरी प्रदूषण आणि हवामान बदलामुळे त्याच्या सौंदर्यावर परिणाम होत आहेहे त्यांच्या चित्रांमधून अधोरेखित होतेव्हेनिस हे शहर देखील त्यांच्या चित्रांमध्ये त्याच्या भव्यतेसोबतच वाढत्या समुद्रपातळीमुळे धोक्यात आलेले दाखवले आहे



डॉलुथरा कलात्मक शैलीत स्थिर  राहताविषयानुसार त्याला साजेशी अभिव्यक्ती निवडतातत्यांची मिश्र-माध्यम पद्धती अॅक्रेलिक आणि वॉटरकलरचे संगम दर्शवतेजिथे इंग्रजी वॉटरकलर परंपरेची सौम्यता आणि भारतीय कला शैलीतील बोलक्या रंगसंगतीचे मिश्रण दिसते.

त्यांचे पूर्वीचे प्रदर्शन प्रतिष्ठित भारतीय ललित कला गॅलरींमध्ये प्रदर्शित झाले असून त्यास समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहेएआयएफएसीएसदिल्लीच्या सीमा बावा यांनी त्यांच्या कार्याचे वर्णन "स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांचे सखोल आणि स्पष्ट चित्रण" असे केले आहेपद्मश्री पुरस्कारप्राप्त प्राबिमान बीदासएआयएफएसीएसचे अध्यक्षयांनी त्यांच्या कार्याचे "साधेपणासौंदर्य आणि सखोल विचारांचे मिश्रण" असे कौतुक केले आहेदिल्लीतील प्रसिद्ध वरिष्ठ कलाकार सिधार्थ यांनी त्यांचे कार्य "ताजेतवाने समकालीन विचार" असे म्हटले आहे.

'होम अँड अब्रॉडकेवळ चित्रांचे संकलन नाहीतर तो एक प्रवास आहे  काळभूगोल आणि जाणीवेच्या सीमांना ओलांडणारा संवादब्रशस्ट्रोक्स आणि शब्द यांच्यातील हा संवाद प्रेक्षकांना केवळ पाहण्यास नव्हेतर विचार करण्यासस्मरण करण्यास आणि पुनर्कल्पना करण्यास प्रवृत्त करतो.


चित्रकारडॉमोहन लुथरा

१७ ते २३ फेब्रुवारी २०२५

जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडा, मुंबई 

 

११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...