किस्मत आर्ट गॅलरीत चित्रकार विरेंद्र चोपडे यांचे 'गुलजार' हे चित्र प्रदर्शन I १३ ते १६ फेब्रुवारी २०२५

 

चित्रकार: विरेंद्र चोपडे

सुप्रसिद्ध चित्रकार विरेंद्र चोपडे यांच्या चित्रांचे गुलजार या शीर्षकांतर्गत एकल प्रदर्शन किस्मत आर्ट गॅलरी११ देना बँक बिल्डिंगतिसरी पास्ता लेनकुलाबा मार्केट समोरकुलाबामुंबई४००००५ येथे दिनांक १३ ते १६ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान भरणार आहे तेथे सर्वांना रोज सकाळी १० ते संध्याकाळी  वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईलया प्रदर्शनाचे उद्घाटन १३ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी .३० ज्येष्ठ चित्रकार फिलिप डिमेलो  विनिता मिरचंदाणीस्टुडिओ  गॅलरीच्या संचालिका यांच्या हस्ते होईल


विरेंद्र चोपडे मूळचे कामठीचेत्यांचे कलाशिक्षण गव्हर्मेंट चित्रकला महाविद्यालय नागपूर येथे झाले  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना २००२ साली BFA ड्रॉईंग  पेंटिंग आणि २००५ साली MFA ड्रॉईंग  पेंटिंग ह्या कलाक्षेत्रातील पदव्या मिळाल्यातत्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन हा कोर्स पूर्ण केला  कलाक्षेत्रात नैपुण्य मिळवलेविद्यार्थी दशेपासूनच  नंतरही त्यांना अनेक मान्यवर कलाप्रवर्तक संस्थांकडून वेळोवेळी पारितोषिके बक्षीसे आणि मानमरातब देऊन गौरविले गेलेत्यांनी मुंबईपुणे, नागपूरनवी दिल्ली, चेन्नईउज्जैनभोपाळखजुराहोमनालीजोधपूर वगैरे अनेक ठिकाणी कलाविषयक उपक्रमातून आपले अतुलनीय योगदान आर्ट कॅम्पस वर्कशॉप एकल आणि सामूहिक कलाप्रदर्शने यांच्या द्वारे दिले आहेत्यांच्या प्रदर्शनांना  कलासादरीकरणाला रसिकांचा सदैव सकारात्मक प्रतिसाद लाभला आहेत्यांची चित्रे अनेक मान्यवर राष्ट्रीय  आंतरराष्ट्रीय स्तरांवरील कलासंग्रहकांकडे आहेत.



प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली चित्रे मुख्यतः निसर्गाची विविध ऋतूतील विलोभनीय रूपेत्यात फुलणारी  आपला सुगंध  परिमळ सर्वत्र पसरवणारी चंपाचमेलीचाफा वगैरे सारखी रंगीबेरंगी फुले आणि त्यापासून मानवी मनावर होणारा संवेदनांचा  भावनांचा सुखकारक परिणाम यावर आधारित आहेतचाफाचमेली  अन्य फुलांपासून निघणारा आसमंतात पसरणारा सुगंध मानवी मनास उत्तेजित करतो आणि त्याच्या चित्तवृत्ती उल्हासित करून त्याला चैतन्यसुखआनंद वगैरेची सुखमय अनुभूती देतोसंवेदनशील मानवी मनात सहजपणे उमलणाऱ्या प्रेमआनंदआठवणमैत्री निरागसताभक्तीलोभरागदुःखवियोगविरहवेदनाअपेक्षाप्रतिक्षा वगैरे भावना त्यांनी मिनीमलेस्टिक (कमीत कमी प्रतिकांचा वापरतंत्रशैलीचा कलात्मक वापर करून आपल्या चित्रमाध्यमातून साकारल्या आहेतकमीत कमी प्रतिके वापरून त्यांनी आपल्या चित्रांमधून आकाररंगपोतसंयोजन  कलात्मकता यांचे रम्य  विलोभनीय दर्शन सर्वांना घडवले आहेमानवी मनास सुखाविणाऱ्या संकल्पनामनाला भावणारे रंग आणि त्यातून सर्वांना लाभणारी सुखावह दृश्यानुभव  मनोहर अशी अनुभूती सर्वांना मानसिक शांतता  सुखद संवेदनांवर आधारित नयनरम्य अनुभव देते आणि त्यांच्या मनावरयोग्य तो परिणाम साधून त्यांची दाद मिळवतेमुख्यतः फुल  त्यापासून सर्वांना प्राप्त होणारा सुखद परिमळ  सुगंध यांची येथे सर्वांना अनुभूती होते  त्यामुळे प्रदर्शनास सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद लाभतो.



किस्मत आर्ट गॅलरीत चित्रकार  विरेंद्र चोपडे यांचे 'गुलजारहे चित्र प्रदर्शन

चित्रकार विरेंद्र चोपडे

किस्मत आर्ट गॅलरीकुलाबामुंबई

दिनांक १३ ते १६ फेब्रुवारी २०२५

सकाळी १० ते संध्याकाळी  वाजेपर्यंत



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...