कलर्राग “COLOURAAG”

 कलर्राग  “COLOURAAG”

        सुप्रसिद्ध चित्रकार पवन कुमार अत्तावर ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई येथे १० ते १६ सप्टेंबर २०२४ ह्या कालावधीत भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. प्रस्तुत प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची चित्रे ऍक्रिलिक माध्यमातील असून त्यात त्यानी पॅलेट नाईफचा कलात्मक वापर उत्तम रित्या केला आहे. अनेक विषयातील मूळ परिणाम आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत त्यांनी येथे चित्रमाध्यमातून साकारला आहे.  ह्या प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण  चित्रे     कलात्मक व आशयघन असूनसंगीतातील विविध नादमय वाद्यांचे, विशेषतः व्हायोलिन ह्याचे प्रकर्षाने दर्शन घडवितात आणि सर्वांना दैवी निरामय सुखानुभव  देतात

पवनकुमार अत्तावर ह्यांचे कलाशिक्षण BFA पर्यंत दावणगिरी येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे झाले. नंतर त्यांनी पुणे येथील C - DAC  ह्या जगप्रसिद्ध संस्थेतून ऍडव्हान्स कॉम्पुटर आर्ट मध्ये पदविका मिळविली. सध्या ते मणिपाल येथील Synamedia Ltd ह्या मूळ इंग्लंडमधील असणाऱ्या सुप्रसिद्ध कंपनीत UI - UX डिझाईन टीम मध्ये कार्यरत आहेत. त्यांना अनेक कलादालनातून आपली चित्रे ह्यापूर्वी प्रदर्शित केली आहेत. त्यांच्या चित्रप्रदर्शनांना सर्व दर्शकांचा सकारात्मक व उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांनी अनेक आर्ट कॅम्प मध्ये भाग घेऊन आपल्या चित्रकलेचे व त्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले आहे. तसेच उडपी येथील आर्टिस्ट्स फोरमचे ते सक्रिय सभासद आहेत. त्यांनी डाली (surrealism), व्हॅन गॉग (Van Gough) (Brush Strokes) व रेम्ब्रँड्ट (Rembrandt) (Light And Shade) ह्या जगप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींतून प्रेरणा मिळाली आहे.


                प्रस्तुत प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची विविध चित्रे मुख्यता नादमयता व संगीत वाद्यांचेत्यासाठी असणारे योगदान ह्या संकल्पनेवर आधारित आहेत. त्यांना संगीताची आवड आहे व सर्व वाद्यांचेआणि त्यातून निघणाऱ्या नादमय लहरींचे त्यांना आकर्षण आहे. विशेषतः व्हायोलिन ह्या वाद्यातूननिघणारे विविध भावपूर्ण सूर आणि त्या लहरी त्यांना खास प्रकारे मोहित करतात. परिणाम स्वरूप त्यांच्या प्रत्येक कलात्मक चित्रामध्ये व्हायोलिन, त्रिशूल, डमरू व इतर नादमय स्वरलहरी निर्माण करणाऱ्या वाद्यांचा समावेश आहे. तसेच नंदीबैल, व इतर धार्मिक संकल्पना ह्यांनी नटलेल्या त्यांच्या आशयघन चित्रांमध्ये पांढरी जागा (White space) व गडद रंगछटा (Dark Tones), ह्यांचा कलात्मक संगम आढळतो. तसेच संगीतातील उच्चस्वर व नीचस्वर (High and Low notes) ह्यांचा परस्परसंबंध आणि त्या विरोधाभासातून प्रगटणारा नादमय स्वराविष्कार ह्यासारख्या प्रतीकांतून त्यांनी आपल्या चित्रांमध्ये मोकळी जागा व गडद छटा ह्यांचा कलात्मक समन्वय साधला आहे व एक आगळावेगळा नादमय कलाविष्कार आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत व तंत्रशुद्ध मांडणीत येथे साकारला आहे.

चित्रकारपवन कुमार अत्तावर

स्थळ: जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई

कालावधी: १० ते १६ सप्टेंबर २०२४

सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...