बुलबुल राय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बुलबुल राय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकर्ती बुलबुल राय हिचे ‘श्रीकंठाय’ हे चित्र प्रदर्शन - बुलबुल राय

  

बुलबुल राय

श्रीकंठाय

                अहमदाबाद येथील प्रसिद्ध चित्रकर्ती बुलबुल राय हिच्या तैलरंग  ऍक्रिलिक रंग वापरून कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीकाळा घोडा, मुंबई ४००००१ येथे २८ ऑक्टोबर ते  नोव्हेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहेते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईलह्या प्रदर्शनात तिने भगवान श्री नीलकंठ अर्थात भगवान शंकर ह्यांच्या जीवनातील विविध पैलू चित्रमाध्यमातून आपल्या कलात्मक  वैशिट्यपूर्ण शैलीत सर्वांपुढे ठेवले असून त्यातील धार्मिक संकल्पनावैचारिक आणि वैषयिक स्पष्टता  बोलकेपणा सर्वांना भावणारा आहे.

                बुलबुल राय हिचे कलाशिक्षण पूर्वांचल विद्यापीठ, अहमदाबाद  येथे झालेनंतर तिने बऱ्याच आर्ट कॅम्पमध्ये आपल्या चित्रकलेचे योगदान दिलेलँडस्केप कॅम्प अहमदाबाद (२०१६)ड्रॉईंग कॅम्प जयपूर (२०१५पेंटिंग वर्कशॉप  - प्रथम कला दालन मुंबई (२०१७)  आणि म्हैसूर म्युझियम तर्फे आयोजित पेंटिंग वर्कशॉप (२०१२ह्या ठिकाणी तिच्या चित्रांची प्रशंसा झालीतसेच विविध शहरातील नामांकित कलादालनातून तिने सामूहिक  एकल चित्रप्रदर्शन आयोजित केलीत  आपली कला रसिकांपुढे सादर केलीSCZCC नागपूर, कॅमल आर्ट फॉउंडेशन, ललित कला अकादमी दिल्ली येथील वार्षिक प्रदर्शनहाथीसिंग कलादालन अहमदाबादकमलनयन बजाज कलादालन मुंबईइंडिया आर्ट फेस्टिव्हलनेहरू सेंटर कलादालन वरळी मुंबईआर्ट देश गॅलरी मुंबईहॉटेल वायझर मँनेर अहमदाबादआयडियल फाईन आर्ट गॅलरी कर्नाटकमंगलोर ग्रुप शोआर्ट एंट्रन्स गॅलरी मुंबईआर्ट लंड गॅलरी दुबई आर्टीवल आर्ट फेस्टिव्हलवर्ल्ड ट्रेंड सेंटर मुंबईजेनेसिस आर्ट गॅलरीअहमदाबादप्रथमेश आर्ट गॅलरीमुंबई वगैरे अनेक ठिकाणी तिने आपली चित्रे प्रदर्शनातून सर्वांसमोर दर्शविलीततिच्या चित्रांना नेहमी सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे


        प्रस्तुत चित्रसंपदा श्रीकंठाय ह्यामध्ये बुलबुल राय हिने तैलरंग  ऍक्रिलिक रंग वापरून कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे सादरीकरण केले आहेत्यातील मुख्य संकल्पना भगवान नीलकंठ अर्थात शिवशंकर  त्याच्या जीवनातील विविध पैलू ह्यावर आधारित आहेतशी संकल्पना करून श्रीकंठाय श्रीकंठाय ह्या पवित्र मंत्राचा १०८ वेळा जप करून त्याद्वारे दुःखऔदासिन्यनाराजी  मानवी जीवनातील प्रतिकूल लहरींना दूर  सारून त्याऐवजी सकारात्मक ऊर्जा  शक्ती तसेच चैतन्य ह्यांचे वरदान लाभो ही मनोकामना तिने चित्रमाध्यमातून व्यक्त केली आहेतिने ह्याद्वारे भगवान नीलकंठ  अर्थात शिवशंकर ह्यांना आपली कलात्मक आदरांजली वाहिली आहेत्यासाठी तिने शंकराचे वाहन नंदीबैलगण वगैरे दर्शविताना गळ्यातील सर्पमालानंदीबिल्वदल पत्रडमरूत्रिशूल इत्यादी प्रतीकांचा कलात्मक वापर केला आहे१२ पैकी  ज्योतिर्लिंगावरील धार्मिक वातावरण  संकल्पना दर्शविताना तिने सोमनाथकेदारनाथभीमाशंकरमहाकालेश्वररामेश्वरम   विश्वनाथ मंदिर वाराणसी ह्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे.


                  आपल्या चित्रातून तिने प्रभावीपणे  परिणामकारक रीतीने तिने शिवाचे अस्तित्व  ती चिरंतन टिकणारी नादमय धार्मिक संकल्पना  अनुभूती ह्यांचा कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण वापर केला आहेतिच्या मनातील दृढ  कायमस्वरूपी भक्तिभाव आणि ती सकारात्मक ऊर्जा  शक्ती सर्वांपर्यंत पोचविण्याचा तिने ध्यास घेतला आणि त्या अर्थपूर्ण चित्रसंपदेतून  तिने भगवान शंकर  त्यांच्या जीवनातील विविध पैलू आपल्या अनोख्या शैलीत अधोरेखित करून प्रस्तुत चित्रसंपदा ह्या प्रदर्शनात सर्वांपुढे सादर केली आहेत्यात तिचा उद्देश सर्व मानवजातीस निरामय सुखशांती लाभून तिचे मंगल  कल्याण होवो आणि सर्व चराचरात आनंद  चैतन्यलहरींचा दरवळ जनमानसात पसरो ही शुभेच्छा आहे.


चित्रकर्ती: बुलबुल राय

स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई

कालावधी: २८ ऑक्टोबर ते  नोव्हेंबर २०२४

सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...