अमिताभ अशेष यांचा 'युफिझम' – चित्रकलेतील नवा दृष्टिकोन जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन



चित्रकार
 : अमिताभ अशेष


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार अमिताभ अशेष यांचे "युन भिहे नाविन्यपूर्ण चित्रकला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीकाळा  घोडा येथे आयोजित करण्यात आले आहेहे प्रदर्शन १० जून ते १६ जून २०२५ या कालावधीत रसिकांसाठी खुले असेल.

या प्रदर्शनात ते युफिझम या संकल्पनात्मक शैलीद्वारे सादर आपल्या कलाकृती प्रदर्शित करत आहेत. IIT आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कला विभागाचे माजी विद्यार्थी असलेल्या अशेष यांनी Bay Area Figurative Movement चे अग्रणी कलाकार फ्रँक लोबडेल यांच्यासह अनेक आधुनिक गुरूंकडून प्रशिक्षण घेतले आहे.


 

युफिझम ही शैली दृश्यअदृश्यआणि भावनिक घटकांना एकत्र आणतेया दृष्टिकोनात पावसाच्या थेंबांमधून मण्यांची माळ तयार होतेसमुद्राच्या लाटा पदरासारख्या वाहताततर खिडक्या प्रकाशाच्या ठोस आकृतींमध्ये रूपांतरित होतातअमिताभ अशेष यांची चित्रशैली हि अनेक वर्षाच्या कलासाधनेतून तयार झाली आहे. 'युफिझमया त्यांच्या वेगळ्या प्रयोगामुळे चित्रकला क्षेत्राला एक नवा कल्ट मिळू शकतोमॉडर्निझमसरिऍलिझमक्युबिझम या चित्रकलेतल्या नव्या वाटा होत्याअनेक जणांनी या वाटेवरून कलासाधना केलीपण त्यानंतर नवा कल्ट तयार झाला नाहीपण अमिताभ यांच युफिझम चित्रकला क्षेत्राला एक नवी वाट देतोज्यातून चित्रकला क्षेत्रात नव्या युगाची निर्मिती होण्याच्या शक्यता तयार होतात




 

अमिताभ यांच्या चित्रांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचा स्पर्श आहे – पोहणेटेनिसबागकाम आणि विविध देशांतील लोकांशी मैत्री ही त्यांची प्रेरणास्थानेत्यांच्या प्रत्येक चित्रासोबत एक लघुकविता दिलेली आहेजी त्या चित्राचा अर्थ अधिक खोलवर उलगडते आणि प्रेक्षकांना साहित्यिक संदर्भातून संवाद साधण्याची संधी देतेअमिताभ यांच्या चित्र विषयांमधून बंगळुरूच्या ब्रिगेड रोडचे दृश्यघरगुती जेवणरस्त्यावरील भुकेल्या कुत्र्यांना अन्न देणारे हात – हे सगळं वेगळ्या नजरेतून टिपले गेले आहे.

 

अमिताभ अशेष  युफिझम ही प्रतिमांच्या नव्या प्रकारासाठी एक संकल्पनात्मक मंच आहेहे रचनात्मक तत्त्वे आणि सौंदर्यशास्त्र  विषयवस्तूंच्या मुळाशी असलेली मांडणी सादर करते.वरिष्ठ चित्रकार वनीदास मंगथिल यांच्या मते, “युफिझम ही शैली संपूर्णपणे वेगळी आहेअतिशय नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी असलेली हि एक नवदृष्टी आहेजी समजून घेणं आणि शोधणं आवश्यक आहे. ”

सदर प्रदर्शन हे रसिकांसाठी दि १० ते १६ जून दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुले असेलचित्रकलेतील नव्या शक्यतांचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून भेट द्यावी असे हे प्रदर्शन आहे.


चित्रकार:  अमिताभ अशेष

स्थळ: जहांगीर आर्ट गॅलरीकाळा  घोडा, मुंबई

कालावधी: १० जून ते १६ जून २०२५

सकाळी ११ ते सायंकाळी  या वेळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अमिताभ अशेष यांचा 'युफिझम' – चित्रकलेतील नवा दृष्टिकोन जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन

चित्रकार  :  अमिताभ   अशेष आंतरराष्ट्रीय   ख्यातीचे   चित्रकार   अमिताभ   अशेष   यांचे  " युन   भि "  हे   नाविन्यपूर्ण   चित्रकला...