सुप्रसिद्ध चित्रकार पिंटू पौल यानी अलिकडच्या काळात काढलेल्या चित्रांचं “इनक्रेडीबल लाईफ स्टाईल ऑफ इंडीयन बाबुमोशाय” हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडलं असून सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे पहायला मिळेल. दि. २७ मे ते २ जून २०२५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील. एक्रिलिक आणि मिक्स मिडीया रंगातील कॅनव्हास व पेपर वरची अप्रतिम चित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
![]() |
चित्रकार: पिंटू पौल |
जन्मताच कलाकाराचा हात घेवून आलेल्या पिंटू पौल यानी कोणतही औपचारीक कला शिक्षण घेतलेलं नाही, असं असलं तरी त्यांच्या घराण्यात चालत आलेल्या कलेचा वारसा मात्र त्यानी पुढे चालवला आणि कलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. पौल यांचे आजोबा मातीची भांडी बनवण्या बरोबरच मातीपासून अनेक देवदेवतांच्या शिल्पकृतीही बनवत असंत. पिंटू पौल यांचे वडील फणी भुषण पौल हे दागिन्यांचे रचनाकार होते. पिंटू पौल यांनी श्री. समर भौमिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या चित्रकलेला मुर्त स्वरूप दिलं.
भारतीय समाजातील स्त्री, तीचे अनेक जीवन स्तर, नजाकत, सौदर्य, भावना या बरोबरच जुन्या जाणत्या लोकांचं चित्रण पौल यांच्या चित्रामधून पहायला मिळतं. त्यांच्या त्रिमिती असलेल्या चित्रांत कमनिय बांध्याच्या परंपरागत वेशातील स्त्रीया गडद रंगातील कपड्यात चितारण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा