१६ एप्रिल ला दुपारी ४ वाजता उद्घाटक प्रा. गौतम गवळी (प्रो व्ही.सी. ॲमीटी युनिव्हर्सिटी) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस.एम. मायकेल (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरचे डायरेक्टर) हजर राहणार आहेत.
कबीर रमेश यांचे फोटोआर्ट कला प्रदर्शन प्रथम जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते. त्यांच्या फोटोग्राफीला सुंदर प्रतिसाद मिळाला. जवळजवळ हजार कलाप्रेमींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिली तसेच
५०० - ६०० फोटो कला प्रेमींनी कबीर रमेश यांचे कौतुक करून पुढील फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन दिले.
सध्याच्या प्रदर्शनात आणखीन नवीन फोटो दिसणार आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचे फोटो जगभराची ओळख तर करून देतातच पण त्या प्रत्येक फोटो कलाकृतीमध्ये त्यांचे वैशिष्ट्य आणि खास शैली लक्षात येते. प्रत्येक फोटो अर्थपूर्ण असतो कधी मानवता तर कधी दररोजच्या जीवनातले क्षण टिपलेले दिसतात.
गेल्या दोन वर्षात त्यांची फोटो कलाकृती नेहरू सेंटरला देखील झळकली. गेल्या मार्च महिन्यात बोरिवलीच्या कलादालनात त्यांचे कौतुक गायक सुदेश भोसलेकडून तसेच ताजमहल हॉटेलच्या ताज गॅलरीमध्ये पद्मश्री प्रेमजीत बारिआ, दिवचे कलाकार यांच्याकडून झाले.
कबीर रमेश यांची कलाकृती पाहताना माणूस गर्क होतो तसेच क्षणभर ठरवूनही जातो. एकूणच तुर्कीचे, इस्तंबूल, लंडन, जर्मनी, फ्रान्सची जगप्रसिद्ध लूव्हर्स म्युझियम या ठिकाणापासून ते भारतातील मुलजी, पुणे, राजस्थान, दिल्ली, मद्रास, कोलकत्ता - शांतिनिकेतन इथपर्यंत सगळ्या ठिकाणी त्यांचा कॅमेरा व कॅमेऱ्यातील एक खास शैलीदार अँगल आपले मन वेधून टाकते.
भारतीय संविधानातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केल्यामुळेच समस्त ललित कलेचा समृद्ध वारसा कलाक्षेत्रात अविरतपणे प्रवाहित आहे. उदा. कोणी लोककलेतून संगीत, नाट्य,चित्र,शिल्प आणि कोणी छायाचित्र कलेतून अभिव्यक्त होताना आपण पाहतो. मान्य आहे कॅमेरा तांत्रिक अंगाने विकसित होत असून कॅमेरा संवेदनशील कातडीत डोकावू शकत नाही. पण संवेदनशील सुदंभ चलचित्रण, चित्र तो अचूक टिपतो. हे मात्र कोणाला ही नाकारणे शक्य आहे काय ?
चर्मचक्षुची दृष्टी जशी सर्वांना आहे तशी कॅमेऱ्यालाही आहे. पण त्यापलीकडे जो ऐतिहासिक, सामाजिक, नैसर्गिक, सौंदर्यशास्त्रीय कलामुल तत्वांना अभिजात कल्पकतेतून समय सूचकपणे क्षणाचाही विलंब न लावता समोरील दृश्यआकृती बंधाला संवेदनशील भावपूर्ण जिवंतपणा टिपतो, साकारतो, अभिव्यक्त होतो. तो केवळ दृष्टी आहे म्हणून नव्हे तर सर्वसमावेशक आकलनाच्या सृजनशील सौंदर्यपूर्ण दूरदृष्टीतून कॅमेऱ्यालाही संवेदनशील बनवतो तोच अभिजात छायाचित्रकाराच्या परिभाषेत बसतो. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगमान्य अभिजात छायाचित्रकार के.के. मूस.
अशाच परिभाषेतील सृजनशील नभावर स्वप्रज्ञाने प्रकाशमान होऊ पाहणारा प्रयोगशील अभिजात छायाचित्रकार आयु कबीर यांचं नाम उल्लेख करावं लागेल.
आयु कबीर यांना जन्मतः च प्रतिभाशाली पालकांचा वैचारिक वारसा लाभलेला असून त्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालेले आहे. म्हणूनच कबीर यांच्या छायाचित्रात भारतीय आणि पाश्चात्य ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा पाहावयास मिळतो. नकळतच कलारसिक छायाचित्र पाहताना त्या त्या काळात हरवून जातो. म्हणून वाटते कोणतीही कला जात धर्म भाषा प्रांत यांची बंधन झुगारून ती कलावैश्विक होऊ पाहते.
कल्पक दृष्टीपातळीतून दृश्याचा रचनात्मक आकृतीबंध कला रसिकांचे लक्ष वेधून घेतो. कलात्मक छायाप्रकाश कधी काळया पांढऱ्या तर कधी रंगमय छटांतून छायाचित्रातील पोत अनुभवताना कला रसिकांमध्ये संवेदना निर्माण करतात. त्याबरोबरच नितळ नैसर्गिक सौंदर्याची प्रचिती देतात.
कबीर यांच्या छायाचित्रात उत्पत्ती स्थिती लय म्हणजे तथागत बुद्धांनी जो अनित्यवाद दिलेले आहे त्याची जाणीव ही करून देतात.
अशा सर्वस्पर्शी विचारातून परिवर्तनशील, प्रयोगशील अभिजात छायाचित्रकाराचे व त्यांच्या निर्मितीचे अभिनंदन व अनेक मंगल कामना.