.jpg) |
शशिकांत पाताडे |
प्रचलित कलाजगतातील एक सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत पाताडे ह्यांच्या चित्रांचे एकल कलाप्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे ७ ते १३ ऑक्टोबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ ह्या दरम्यान विनामूल्य बघता येईल. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी भारतातील वेगवेगळ्या भागातील ऐतिहासिक वास्तूंची वैशिष्ट्ये व परंपरा दर्शविणारी चित्रे ठेवली आहेत. तसेच मुंबई व इतर शहरात होणारे सण समारंभ व त्यांच्या धार्मिक रूढी व इतर ग्रामीण भागात आढळणारी निसर्गाची विलोभनीय रूपे व तेथील सृष्टी सौंदर्य ह्यांचे एक रम्य दर्शन सर्वांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व कलात्मक शैलीत घडवले आहे.
प्रस्तुत कलाप्रदर्शनात त्यांनी ऍक्रिलिक, तैलरंग व मिक्स मिडीयम व त्याचे कला त्मक लेपन ह्यांचा फार वैशिष्ट्यपूर्ण वापर करून तयार केलेली विविध चित्रे ठेवली आहेत.
मुंबईतील व इतर परिसरातील नामवंत वास्तू जसे गेटवे ऑफ इंडिया, इरॉस सिनेमा बिल्डिंग, MCGB व CST रेल्वे स्टेशन बिल्डिंग, जयपूर, उदयपूर व राजस्थान मधील अनेक ऐतिहासिक वास्तू, किल्ले व तेथील परंपरागत वैशिष्ट् ये आणि सामाजिक जीवनशैली वगैरेचे एक आकर्षक दर्शन घडविले आहे. तसेच मुंबईची जीवनवाहिनी - Life Line लोकल रेल्वे व तिची वैशिष्ट्ये त्यांनी चित्ररूपात येथे ठेवली आहे. कोकण व इतर ग्रामीण परिसरातील जीवन व त्यातील षशयघनता व साधेपणा दर्शविताना त्यांनी तेथील भातशेती, लोकांचे दैनंदिन जीवन व निसर्गाची विविध लक्षवेधी रूपे ह्यावर भर दिला आहे. गणपती विसर्जन व इतर महोत्सवाच्या दरम्यान मुंबई व इतर प्रांतात आढळणारे उत्साही वातावरण आणि जनसागराचा दुर्दम्य उत्साह, वगैरेचे त्यांनी फार उत्कटतेने आपल्या चित्रातून सादरीकरण केले आहे. ह्या कलात्मक साद्रीकरणास सर्वांचा उदंड व सकारात्मक प्रतिसाद लाभेल व त्याद्वारे चित्रकार
शशिकांत पाताडे ह्यांना त्यांच्या पुढील सादरीकरणासाठी योग्य प्रोत्साहन मिळेल ही आशा आहे.
भारतातील वारसा आणि निसर्गाची विलोभनीय दृष्ये दर्शविणारे कलाप्रदर्शन
चित्रकार: शशिकांत पाताडे
स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: ७ ते १३ ऑक्टोबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा