जहांगीर आर्ट गॅलरीत गुरदीप धीमान ह्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन I १८ ते २४ डिसेंबर २०२४

सुविख्यात छायाचित्रकार गुरदीप धीमान ह्यांच्या छायाचित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालनातील टेरेस आर्ट गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे १८ ते २४ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी निसर्गाचे वैभव दर्शविणारी छायाचित्रे, व्यक्तिदर्शनपर छायाचित्रे व रचनात्मक शैलीतील ऐतिहासिक वास्तूंची परंपरा दर्शविणारी छायाचित्रे सादर केली आहेत.

छायाचित्रकार गुरदीप धीमान

 गुरदीप धीमान ह्यांचे कलाशिक्षण MFA   ड्रॉइंग्स व पेंटिंग मध्ये - डिपार्टमेंट ऑफ फाईन आर्ट, कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र, हरियाणा येथे झाले. त्यानंतर त्यांनी अंदाजे ४०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकल व सामूहिक प्रदर्शनातून आपल्या कलेचे विविध पैलू रसिकांपुढं सादर केले आहेत. त्यांच्या प्रदर्शनांना नेहमी रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थांकडून वेळोवेळी गौरविले असून बरीच बक्षिसे व मानमरातब लाभले आहेत. सक्षम स्पर्श आर्ट फौंडेशन चंदिगढ ह्या संस्थेचे संस्थापक सदस्य तेथील पंजाब ललित कला अकादमीचे अध्यक्ष, खालसा कॉलेज, पतियाळा येथील बोर्ड ऑफ स्टडीजचे सभासद, तसेच कुरुक्षेत्र विद्यापीठातील फाईन आर्ट  विभागातील बोर्ड ऑफ स्टडीजचे माजी सभासद वगैरे पदे त्यांनी भूषविली आहेत. तसेच चंदिगढ ललित कला अकादमीतर्फे लंडन येथील आर्ट गॅलरीत व म्युझिअम ला भेट देण्यासाठी पाठविलेल्या चमूत ज्येष्ठ कलाकार म्हणून सहभाग, दिली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी (AI FACS) तर्फे विविध मानसन्मान इत्यादींचा त्यांना लाभ झाला आहे. तसेच ग्रीस मधील आर्ट ऑफ सोशल मीडिया तर्फे आयोजित प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय  बक्षीस, २०२२ मध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये त्यांचा समावेश, भारत सरकारच्या सूचना व प्रसार खात्यातर्फे दिला जाणारा  उत्तम छायाचित्रकार पुरस्कार, युनायटेड आर्टिस्ट ऑफ मालदीव तर्फे ICCR व भारतीय वकालत च्या सहयोगातून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय  पुरस्कार वगैरेंचा लाभ झाला आहे.  


प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली छायाचित्रे लेह व लडाख येथील निसर्गवैभव, विविध व्यक्तींचे भावविश्व् आणि त्यांचे विविध पैलू तसेच रचनात्मक शैलीत कलात्मकतेने भारतीय संस्कृती व परंपरा दर्शविणारी छायाचित्रे समाविष्ट केली आहेत.       तसेच हिमालयातील परिसरातील व लेह लडाख परिसरातील गडद निळे आकाश, दाट हिरवाईने नटलेली निसर्गाची विविधांगी रूपे व प्राकृतिक सौंदर्याने नटलेले अनेक ऋतूतील आविष्कार ह्यांचा त्या प्रदर्शनात समावेश केला आहे. हया प्रदर्शनातील छाया चित्रांमध्ये भुपृष्टाचा आभास निर्माण करताना त्यांनी लेह व लडाख येथील वालुकामय भागाचा आणि त्या पोताचा समावेश केला आहे. त्यामुळे तेथील वाळू व त्यावरील प्रकाश ह्याचा वाळवंटा सारखा परिणाम त्यांनी दाखविला आहे. तेथे नैसर्गिक छाया व प्रकाश ह्यांचा बदलत्या काळानुरूप होणार  साक्षात्कार  तसेच वैशिट्यपूर्ण रंगसंगतीने नटलेल्या इमारती व त्यांचे रचनात्मक पैलू, सामान्य जन जीवन व सामाजिक जाणिवा ह्यांची  अनेकविध रूपे वगैरेचा समावेश कलाकाराने ह्या प्रदर्शनात जाणीवपूर्वक केला आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...