जहांगिर आर्ट गॅलरीत वैभव ठाकूर यांचे 'ऱ्हिदम ऑफ सिटी लाईफ' हे चित्र प्रदर्शन

 सुप्रसिद्ध चित्रकार वैभव ठाकूर यांचे 'ऱ्हिदम ऑफ सिटी लाईफहे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीत

चित्रकारवैभव ठाकूर 

मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरातील जीवनाची लय  तिचे वैविध्यपूर्ण पैलू कलात्मक रीतीने आपल्या तंत्रशुद्ध शैलीत दर्शवणारे सुप्रसिद्ध चित्रकार वैभव ठाकूर यांचे 'ऱ्हिदम ऑफ सिटी लाईफहे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालनमहात्मा गांधी मार्गमुंबई ४००००१ येथे १२ ते १८ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान भरणार आहेते सर्वांना तेथे रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईलत्या प्रदर्शनात ठेवलेली त्यांची ॲक्रिलिक रंगसंगती वापरून कॅनव्हासवर काढलेली विविधलक्षी चित्रे मुंबईसारख्या महानगरातील जीवनशैलीचे  त्यातील संघर्षमय वैशिष्ट्यांचे एक नितांतसुंदर दर्शन सर्वांना घडवतात.

 

वैभव ठाकूर यांचे कलाशिक्षण एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट बांद्रामुंबई  नंतर सर जे.जेस्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झालेविद्यार्थी दशेपासूनच त्यांना विविध बक्षीस  पुरस्कार लाभलेत  त्यांचा कलाक्षेत्रातील मान्यवर संस्थांनी गौरव केलामुंबईनवी दिल्ली वगैरे ठिकाणी असलेल्या अनेक कलादालनातून त्यांनी एकल  सामूहिक प्रदर्शनांतून आपल्या चित्रांचे सादरीकरण केले आहेतसेच विविध कलाप्रवर्तक संस्थांतर्फे आयोजित कला विषयक कार्यशाळाकॅम्पस वगैरेत सक्रिय भाग घेऊन त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान चित्रकलेच्या प्रसारासाठी नेहमी दिले आहेत्यांच्या चित्रप्रदर्शनांना नेहमी रसिकांचा उदंड  सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहेअनेक मान्यवर संग्रहकांकडे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण  कलात्मक चित्रे संग्रही आहेतवसई विकासिनी कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्टवसई येथे कला अध्यापक म्हणून कार्यरत आहेत




 

प्रस्तुत प्रदर्शनातील त्यांची ॲक्रिलिक रंगसंगतीतील कॅनवासवरील चित्रे मुंबई शहरातील गतिमान जीवनतेथील नागरिकांची  कष्टकरी वर्गाची संघर्षमय जीवनपद्धती  शैली यांचे एक रम्य दर्शन सर्वांना घडवतातमुंबईतील ऑफिसेसमध्ये डबा पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांचे कष्टप्रद  संघर्षमय जीवनपद्धतीअहोरात्र गर्दीमध्ये रस्ते आणि त्यावरील रहदारीसकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तेथील जीवनशैलीत आढळणारी गतिमानता  त्यात सहभागी असणाऱ्यांची मानसिकताजिद्द  सदैव कष्ट यांचे कलात्मक दर्शन त्यांनी या चित्रमाध्यमातून सर्वांना घडवले आहे




 

त्यांची चित्रे मुख्यतः 'टिफिन सर्विस'- डबेवाले  त्यांचे कष्टमय जीवन 'सायकल ऑफ लाईफ'- शहरातील रस्त्यावर पादचारीसायकलस्वारस्कूटरस्वारविविध वाहने आणि त्यातून संभवणारी अहोरात्र वाहतुकीची कोंडी आणि ''सिटी लाइट्स' - नेहमी सकाळी प्रातःकाळापासून मध्यरात्रीपर्यंत कार्यव्यग्र असणाऱ्या कष्टकरी बांधवांची जीवनशैली  त्यांची कामावरील निष्ठा आणि कामाच्या पूर्ततेचा निर्धार वगैरे पैलू प्रकर्षाने दर्शवणारी आहेत.


चित्रकारवैभव ठाकूर 

स्थळजहांगिर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई 

कालावधी१२ ते १८ नोव्हेंबर २०२४

वेळसकाळी ११ ते सायंकाळी  वाजेपर्यंत 

जहांगिर आर्ट गॅलरीत विरेंद्र कुमार यांच्या 'इन्फिनिट स्पेस' हे अमूर्त शैलीतील चित्र प्रदर्शन

  

चित्रकार विरेंद्र कुमार

प्रसिद्ध चित्रकार विरेंद्र कुमार हयांच्या अमूर्त शैलीतील चित्रांचे 'इन्फिनिट स्पेसया शिर्षकांतर्गत एकल प्रदर्शन जहांगीर कलादालनकाळा घोडा मुंबई ४००००१ येथे  ते ११ नोव्हेंबर २०२४ हया कालावधीत भरणार आहे ते तेथे सर्वाना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यत विनामूल्य बघता येईल.

 प्रस्तुत प्रदर्शनात ॲक्रिलीक रंगसंगती वापरुन कॅनव्हासवर काढलेली त्यांची चित्रे अमूर्त शैलीतील असून त्यात प्रामुख्याने निसर्ग वैभववातावरणातील बदल आणि विविध ऋतूत होणारे त्यातील परिवर्तन हयावर  आधारित आहेततसेच मानवी जीवनातील भावविश्व आणि त्यातील होणारे कालानुरुप चढउतार  भावनिक संघर्ष वगैरेंचा समावेश आहेउस्फूर्तता  स्पष्टता तसेच त्यातील आशय प्रकट करणारी अमूर्तता हयांचा कलात्मक संगम साधून त्यांनी आपल्या खास तंत्रशुध्द शैलीत बनविलेली चित्रे मनाला भुरळ पाडतात


 



अल्ट्रामरीन ब्लूजजेड ग्रीनरुबी रेडटोपाझ यलो, वरडिन ग्रीन वगैरे रंगछाटाच्या कलात्मक वापरातून त्यांनी साधलेला अलौकिक दृश्यपरिणाम खरोखर सर्वाना थक्क करतोत्यात नाद माधुर्यकलात्मकता आणि अपेक्षित दृश्यपरिणाम विविध रंगलेपनातून नेमकेपणाने दाखविण्याची त्यांची तळमळ  उत्कटता हयांचे सर्वाना हया प्रदर्शनात दर्शन होतेतसेच निसर्गचित्रांमधील वैविध्य  त्यातील मानवी मनास भुरळ घालणाया अनेक सौंदर्यपूर्ण संकल्पना हयांचे सर्वाना येथे प्रामुख्याने दर्शन घडतेत्यांच्या पासिंग थॉटसदि रिबर्थस्पेपस फॉर ब्लिसअंननोन कनेक्शनएक्सप्लोरेशन इन ब्लूअपस् अॅन्ड डाऊनदि जर्नी वगैरे चित्रातून प्रत्येक सहृदय रसिकाला हया वैशिष्टयपूर्ण कलात्मक संकल्पनांची अनुभूति होते



चित्रकार विरेंद्र कुमार

स्थळजहांगीर कलादालनकाळा घोडा मुंबई

कालावधी ते ११ नोव्हेंबर २०२४

वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यत


नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...