जहांगिर आर्ट गॅलरीत मदन पवार यांचे 'ब्ल्यू सिटीज - 'द पोएटिक सोल' हे चित्र प्रदर्शन

 

चित्रकार: मदन पवार

सुप्रसिद्ध
 समकालीन चित्रकार मदन पवार यांच्या जलरंगातील चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई  ४००००१ येथे दिनांक १९ ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान भरणार आहेते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईलह्या प्रदर्शनात त्यांनी जलरंगाच्या कलात्मक छटातून तयार केलेली चित्रे राजस्थानमधील जोधपुर शहरातील घरांचे सौंदर्य  त्यांचे रचनात्मक पैलू आकर्षक रीतीने दर्शवतात.
ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन १९ नोव्हेंबर २०२४ रोजी जहांगीर कलादालनमुंबई येथे .०० वाजता मान्यवर अतिथी परवेझ दमानिया(कला संग्राहक संजना शाह  (ताओ आर्ट गॅलरी,मुंबईयांच्या हस्ते होईल.

 

मदन पवार यांचे कलाशिक्षण सर जे.जेस्कूल ऑफ आर्टमुंबई येथे झालेत्यांना अनेक मान्यवर कला प्रवर्तक संस्थांनी फेलोशिप  पारितोषिके देऊन गौरविले आहेत्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य पुरस्कारललित कला अकादमी नवी दिल्लीतर्फे राष्ट्रीय एकात्मिक पुरस्कारसर जे.जेस्कूल ऑफ आर्ट मुंबईतर्फे फेलोशिप वगैरेचा समावेश होतोत्यांनी मुंबईपुणेकोलकत्ताहैदराबादनवी दिल्लीलखनऊ वगैरे बऱ्याच ठिकाणी एकल  सामूहिक चित्रप्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे सादर केली आहेततसेच वडोदराकोकणजयपुरसिमलापुणेमुंबई वगैरे ठिकाणी आर्टकॅम्प  वर्कशॉप मध्ये सक्रिय भाग घेतला  चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिलेत्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनांना सदैव उदंड  सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहेमुंबई, USA,जपानपुणेवडोदरानवी दिल्लीगोवाअहमदाबाद वगैरे ठिकाणी असणाऱ्या मान्यवर कलासंग्रहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत

 

प्रस्तुत प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची चित्रे जलरंगातील एका विशिष्ट्य तंत्रशैलीवर आधारित आहेतराजस्थानातील जोधपुर शहरातील वैशिष्ट्यपूर्ण घरेत्यांचे छतजोधपुर शहराच्या भिंतींचे रंगघराचे मूलभूत सौंदर्य  रचनात्मक वैशिष्ट्ये एका आकर्षक पद्धतीने मदन पवार यांनी सादर केली आहेतसूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी घराच्या भिंतींचे सोनेरी निळसर रंग त्यांनी प्रकर्षाने दर्शविले असून तेथील लोकांचे राहणीमान  जीवनशैली यांचे कलात्मक दर्शन घडविताना लाल दगडांच्या बांधकामात बांधलेली घरे मातीच्या पायऱ्यांसह काढली आहेतही कृतिशीलता  जिवंतपणा चित्रमाध्यमातून चित्रकाराने येथे सादर केली आहेबांबूवर काम करणारे लोकरंगीबेरंगी बांधणीच्या पगड्या घालणारे लोकसाड्या तयार करणारे लोकसोनारांच्या गल्ल्यापूजापाठ करणाऱ्या ब्राह्मणांची वस्ती वगैरे विविध मोहल्ल्यातील लोकांचे सामाजिक जीवन  इतर पैलू यांचे एक रम्य दर्शन घडवताना 'ब्ल्यू सिटीम्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोधपूर शहराची अनेक वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या चित्रात दाखवली आहेतजोधपुर मधील घर एक प्रकारचं लिंबाच्या ठोशाचे मॉर्टर म्हणजे सुरखीचुन वापरून बनवलेली असतातज्यामध्ये ताम्र सल्फेट वापरल्यामुळे त्या घरांच्या भिंतीला निळसर रंग येतो जो टर्माइट्सपासून संरक्षण देतोया निळसर रंगाच्या वापरामुळे किल्ल्यावरून शहराच्या दृश्याला एक विशेष निळसर रंग प्राप्त होतो.

 



मदन पवार यांनी त्यांच्या हवाई दृष्टिकोनांच्या रचनांमध्ये ग्रीडस  स्थापत्याच्या रचनांचा कलात्मक उपयोग केला आहेत्यामुळे रंग भरून ह्या रचनांमध्ये जादुई प्रतिमांची निर्मिती होते  सर्वांना एक वेगळा दृश्यानुभव मिळतोपॉल सेझानच्या फॉविस्ट लँडस्केपमधून प्रेरणा घेऊन मदन पवार यांनी आपल्या स्वतंत्र  कलात्मक शैलीत येथे बोलकी  अर्थपूर्ण चित्रे रसिकांपुढे सादर केली असून ती सर्वांना आगळावेगळी अनुभूती  शांती देतात आणि त्यांच्या अंतर्मनांचा ठाव घेताततसेच चित्रांमध्ये तीव्र  चौकोनी आकार आहेत जे एकमेकांशी निगडित आहेत  हा प्रभाव एक प्रकारे प्रिझमसारखा आहे.


ब्ल्यू सिटीचे ' पोएटिक सोल' (निळसर शहराचा काव्यमय आत्मा)

चित्रकार: मदन पवार .

स्थळजहांगिर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई 

कालावधी: १९ ते २५ नोव्हेम्बर२०२४

वेळसकाळी ११ ते सायंकाळी  वाजेपर्यंत  

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...