जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार अमित गौतम यांचे 'how to disappear completely' हे चित्र प्रदर्शन


चित्रकार : अमित
 गौतम

सुप्रसिद्ध समकालीन चित्रकार अमित गौतम यांचे 'how to disappear completely' हे चित्र प्रदर्शन

जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडामुंबई येथे दि १५ ते २१ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

 

अमित गौतम हे व्हिज्युअल आर्टिस्ट असून जलरंग माध्यमावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहेअमित गौतम यांनी प्रसिद्ध अशा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन येथून डिझाइन या विषयाचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले आहेत्यांची आत्तापर्यंत अनेक चित्र प्रदर्शने देशविदेशात आयोजित झाली असून अमेरिकेतील फॉल ब्रुक आर्ट सेंटरमिडल टाऊन आर्ट सेंटरमोर्सेवे वीला आर्ट सेंटरप्रयोर आर्ट गॅलरीमिशेलसून म्युझिअम ऑफ आर्ट येथे त्यांची चित्र प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत



जलरंग हे माध्यम हाताळण्यासाठी अतिशय कठीण असतेप्रवाही अशा जलरंगाना कागदावर हव्या त्या पद्धतीने वळवण्यासाठी प्रचंड साधना लागतेआणि गौतम यांची चित्रे पाहिल्यानंतर या माध्यमावरच त्याचं प्रभुत्व पाहून थक्क व्हायला होतंप्रस्तुत प्रदर्शन हे गौतम यांनी काढलेल्या उत्तमोत्तम व्यक्तिचित्रांच दर्शन कला रसिकांना करून देते.गौतम यांना मानवी आयुष्याचंचेहऱ्याचंआकर्षण आहेत्यांच्या विशिष्ट शैलीतील व्यक्ती चित्रे  निसर्ग चित्रे या प्रदर्शनात रसिकांना पाहायला मिळतील..त्यामुळे ते प्रामुख्याने व्यक्तीचित्रण या माध्यमातूनच अभिव्यक्त होतातमानवी आकृतींचं चित्रण हा नेहमीच गौतम यांच्या अभिव्यक्तीचा आणि कलेतील प्रयोगाचा गाभा राहिला आहेत्यांच्या चित्रातील चेहरे हे त्या व्यक्तीच्या आयुष्याचा आरसा असतातते काही बोलू पाहतातत्यांची कहाणी सांगतातचित्रात हे सांगणं उतरवणं अत्यंत कठीण असतंत्यामुळे जलरंग मध्यमावरील त्यांचे प्रभुत्व आणि आशयघनता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी त्यांच्या चित्रात रसिकांना पाहायला मिळतात



 

प्रस्तुत प्रदर्शन हे कला रसिकांना काही सांगू पाहत नाहीतर त्यांना रंगांचंत्यातल्या छाया नाट्याचं

दर्शन करवून देतातकागदावर मुक्तपणे वाहिलेले तरीही शेवटी एका आकारात बांधलेले जलरंग रसिकांसाठी रंगांचा उत्सव साजरा करतातउन्मुक्त तरी कॅनव्हासच्या सिमेत बांधलेले रंग चित्र विषयाला जिवंत करतात.  

 

गौतम हे उत्तम डिझाइनर आहेतत्यामुळे डिझाईन या व्यवसायासाठी लागणारी शिस्तचित्र तंत्रावरची हुकूमत त्यांच्या चित्रांमधून दिसून येतेपण त्याचबरोबर उस्फूर्तता आणि अभिव्यक्ती हे त्यांच्या चित्रांचे महत्वपूर्ण वैशिष्टय ठरते


 

प्रस्तुत प्रदर्शन हे कला रसिकांसाठी दि दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत मोफत खुले असेलत्यामुळे कला रसिकांनी अभिव्यक्ती आणि तंत्रावरची पकड अशा दोन्ही माध्यमात अव्वल ठरणाऱ्या या चित्रासोहळ्याचा आस्वाद जरूर घ्यावा. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...