नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत आत्म्याशी संवाद साधणारे समूह चित्र प्रदर्शन — "The Art of Now"

 साहस आर्ट फाउंडेशन (SAF)तर्फे "The Art of Now", या  सामूहिक चित्रप्रदर्शनाचे आयोजन दि १३ ते १९ मे २०२५ दरम्यानमुंबईतील प्रतिष्ठित नेहरू सेंटर आर्ट गॅलरीवरळीमुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेया प्रदर्शनात चित्रकार  रितू गोयलरोझी गुणितीज्योती चोरडिया आणि इती जैन यांच्या  कलाकृतींचा समावेश आहे

प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रकारांच्या कलाकृती या रसिकांना आधुनिक भारतीय कलेकडे पाहण्याचा एक नवीन  दृष्टीकोन देतात.  या प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये विषयांचे वैविध्य पुरेपूर आहेयामध्ये  पुराणकथानिसर्गभावनिक चिंतन आणि आध्यात्मिक अभिव्यक्ती यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे

 

रितू गोयल या एक अनुभवी समकालीन  अमूर्त चित्रकार आहेत.  आपले ध्यानधारणा  आध्यात्मिक अनुभव रंगांच्या माध्यमातून त्या कॅनव्हासवर उतरवतातत्या भारतीय पुराणकथांचा आधुनिक दृष्टिकोनातून पुनरावलोकन करतातजिथे तेजस्वी अमूर्तता आणि तत्त्वज्ञानात्मक शांतता यांचा सुरेख संगम दिसतो.  त्यांच्या चित्रांमध्ये  शांततासकारात्मकता आणि सांस्कृतिक चिंतन प्रतिबिंबित होते.


 
__________________________________________________________________


रोझी गुणिती या पेशाने आणि आवडीने चित्रकार आहेतरोझी गुणिती यांनी जैवतंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात कारकीर्द सुरू केलीमात्र अंतर्मनातील आवाज ऐकून त्यांनी प्रयोगशाळेचा मार्ग सोडून रंगांनी भरलेल्या कलेच्या जगात प्रवेश केलाकला म्हणजे आत्म्याशी नातं — आनंदभावनाआणि जीवनाच्या रंगीबेरंगी प्रवासाची भाषाविविध माध्यमांतून प्रयोग केल्यानंतरहीकॅनव्हासवर टेक्सचरसह क्रिलिक रंगकाम हेत्यांच्या आवडीचं माध्यम ठरलं आहेएक कलाकार आणि कलाशिक्षिका म्हणूनरोझी यांना निसर्गाशी आणि जगभरातील लोकांशी संवाद साधण्यात समाधान आणि आनंद मिळतोत्यांची चित्रकला  ही केवळ अभिव्यक्ती नसूनती आत्मिक शांततेचा आणि सर्जनशील स्वातंत्र्याचा उत्सव आहे.

 


 

_________________________________________________________________________________________


ज्योती चोरडिया या व्यावसायिक चित्रकार  आणि SAF च्या सहसंस्थापक आहेतत्यांच्या  चित्रांमध्ये भावनिक अभिव्यक्ती आणि प्रतीकात्मकतेचं मिश्रण आहेभारत आणि परदेशातील त्यांच्या अनुभवांनी त्यांच्या शैलीत विविधता आणली आहेतेजस्वी रंग आणि लवचिक रेषांच्या माध्यमातून त्या स्वतःसमाज आणि भावना यांच्यातील संबंध उलगडतातत्यांच्या चित्रांमध्ये एकाच वेळी  वैयक्तिक आणि आध्यात्मिक शोध अधोरेखित केला जातो.


 

 ________________________________________________________________________


इती जैन या आयटी व्यावसायिक असूनही त्यांना  चित्रकलेचा  ध्यास आहेइती जैन यांच्या कलाकृतींमध्ये इंप्रेशनिस्ट शैलीचा प्रभाव आहेत्या निसर्गाच्या क्षणिक सौंदर्याला चित्रित करतातक्लॉद मोने यांच्यापासून प्रेरणा घेतत्या वॉटरकलर आणि ॅक्रिलिकमध्ये पॉइंटिलिझम आणि मोज़ेक सारख्या तंत्राचा वापर करतातत्यांच्या कलेचा हेतू म्हणजे प्रेक्षकांना निसर्गाच्या सूक्ष्म गोष्टींकडे सजगपणे पाहायला शिकवणं.


 

 

The Art of  Now हे केवळ प्रदर्शन नाही  तर हे कलेच्या विविध दृष्टिकोनांचाअंतर्मनातील आवाजाचा आणि मूल्यांचा संगम आहेरितू गोयलरोझी गुणितीज्योती चोरडिया आणि इती जैन यांच्या विविधतेने नटलेल्या चित्रांमधून प्रेक्षकांना थांबण्याचंचिंतन करण्याचं आणि पुन्हा स्वतःशीनिसर्गाशी आणि कलेशी जोडण्याचं आवाहन केलं जातं.

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत आत्म्याशी संवाद साधणारे समूह चित्र प्रदर्शन — "The Art of Now"

  साहस   आर्ट   फाउंडेशन  (SAF) तर्फे  "The Art of Now",  या    सामूहिक   चित्रप्रदर्शनाचे   आयोजन   दि   १३   ते   १९   मे   २०२५...