जहांगिर आर्ट गॅलरीत शशिकांत पाताडे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

 

शशिकांत पाताडे

प्रचलित कलाजगतातील एक सुप्रसिद्ध चित्रकार शशिकां पाताडे ह्यांच्या चित्रांचे कल कलाप्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे  ते १३ ऑक्टोबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहेते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  ह्या दरम्यान विनामूल्य बघता येईल.  प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी भारतातील वेगवेगळ्या भागातील ऐतिहासिक वास्तूंची वैशिष्ट्ये  परंपरा दर्शविणारी चित्रे ठेवली आहेततसेच मुंबई  इत शहरात होणारे सण समारंभ  त्यांच्या धार्मिक रूढी  इतर ग्रामीण भागात आढळणारी  निसर्गाची विलोभनीय रूपे  तेथील सृष्टी सौंदर्य ह्यांचे एक रम्य दर्शन सर्वांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण   कलात्मक शैलीत घडवले आहे.

 प्रस्तुत कलाप्रदर्शनात त्यांनी ऍक्रिलिक, तैलरंग व मिक्स मिडीयम   त्याचे कला त्मक लेपन ह्यांचा फार वैशिष्ट्यपूर्ण  वापर करून तयार केलेली विविध चित्रे ठेवली आहेत.  

मुंबईतील  इतर परिसरातील नामवंत वास्तू जसे गेटवे ऑफ इंडियाइरॉस सिनेमा बिल्डिंग, MCGB  CST रेल्वे स्टेशन बिल्डिंगजयपूरउदयपूर  राजस्थान  मधील अनेक ऐतिहासिक वास्तूकिल्ले  तेथील परंपरागत वैशिष्ट् ये आणि सामाजिक जीवनशैली वगैरेचे एक आकर्षक दर्शन घडविले आहे. तसेच मुंबईची जीवनवाहिनी - Life Line  लोकल रेल्वे  तिची वैशिष्ट्ये त्यांनी चित्ररूपात येथे ठेवली आहेकोकण  इतर ग्रामीण परिसरातील जीवन  त्यातील षशयघनता  साधेपणा दर्शविताना त्यांनी तेथील भातशेतीलोकांचे दैनंदिन जीवन  निसर्गाची विविध लक्षवेधी रूपे ह्यावर भर दिला आहे. गणपती विसर्जन  इतर महोत्सवाच्या दरम्यान मुंबई  इतर प्रांतात आढळणारे उत्साही वातावरण आणि जनसागराचा दुर्दम्य उत्साहवगैरेचे त्यांनी फार उत्कटतेने आपल्या चित्रातून सादरीकरण केले आहेह्या कलात्मक साद्रीकरणास सर्वांचा उदंड  सकारात्मक प्रतिसाद लाभेल  त्याद्वारे चित्रकार 

शशिकांत पाताडे ह्यांना त्यांच्या पुढील सादरीकरणासाठी योग्य प्रोत्साहन मिळेल ही आशा आहे


भारतातील वारसा आणि निसर्गाची विलोभनीय दृष्ये दर्शविणारे कलाप्रदर्शन

चित्रकार: शशिकांत पाताडे

स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई

कालावधी:  ते १३ ऑक्टोबर २०२४

वेळसकाळी ११ ते संध्याकाळी 


इक्को गॅलरी | The sensation of aperture

वस्तुविश्वाचा कल आपला तोल सांभाळण्याकडे असतो. अनंत अवकाशात पसरलेल्या ग्रहमालां पासून ते धुळीच्या कणांत सामावलेल्या  अणुपरमाणूपर्यंत । स्वतःमध्ये सामावलेल्या चैतन्याचा जवाब ते सतत शोधीत असतात आणि तो सापडला की त्या दोहोंच्या संयोगातून एक सचेतन तोला'ची स्थिती निर्माण होते अशा स्थितीमध्ये स्थिरतेत, निश्चलतेत, गतीची जाणीव होत राहते. अवचेतन वाटणाऱ्या अवस्थेत चैतन्याचा साक्षात्कार होतो. या स्थितीची जाणीव हीच या कलाकृतींचा आधार आहे. कलावंत रेषांच्या आकारांच्या घनतेच्या अंगीभूत सचेतनाला योग्य असे 'तोल' निर्माण करून एक घडणात्मकता घडवून आणतो त्या ठिकाणी / कलाकृतीत जीवनौधाचे स्पंदन अडकून पडते. 


                       इक्को गॅलरी | ikko gallery

कलाकृती निर्माण करताना त्या त्या कलेच्या साधनांनी घातलेल्या बंधनांशी कलावंताला सतत झगडावे लागते. कलेची साधने समाजाच्या संकल्पनांची साधनं, परंपरांची साधनं, अभिव्यक्तीला नेहमीच स्थळ काळ आणि साधनं यांच्या मर्यादेतून अमर्याद  संवेदनाना निर्माण करीत आला आहे. 

कलाकृति वैचारिक, औदयोगिक, आणि  सामाजिक क्रांती या स्तरांमधून जाऊन स्वयं अस्तित्व  निर्माण करीत आहे. आदर्श जीवन शैली , रोमॅटीसीझमचे विषय चित्रित करणारे कलावंत पहिले जागतिक महायुद्ध आणि औद‌योगिक क्रांतीनंतर  सामान्य सामाजिक जीवनाचे सार चित्रित करू लागला. आधुनिकतेने जन्मलेल्या युक्तीवादाला कलाकाराने स्वयंचेतनेने एक आधुनिक कलात्मकत चैतन्य साकारले. परिणामांतून जन्मलेली स्वयंचेतना चित्रकाराला मागील अनेक दशके चित्र निर्मातीसाठी प्रेरित करीत आलेली आहे. चित्रकारांनी साधनांची अमर्यादता आणि संकल्पनांची अथांगता यातून एक समकालीन परिणाम स्वतःच्या चक्षुसापेक्षतेने चित्राकृतीत निर्माण करण्याचे धाडस करुन.एक आभासमय चित्र‌विश्व निर्माण केले.


              अपूर्वा देसाई | Artist: Apruva Desai

आधुनिक वैश्विक कलाजगातही चित्रकार ह्याच धाडसाचे आभासमय चित्रण करीत आहे. व्यक्तिगत दृष्टीसापेक्षतेतून  एक वैश्विक सापेक्षता निर्माण करीत आहे. 

' द संस्नेशन ऑफ अॅपस्चर' 'Sensation of Aperture या प्रदर्शनातून या वैश्विक सापेक्षतेला  एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व चित्रे हि  गती, द्रव्यमानता ,वेळ आणि स्थान या नुसार एकमेकांत गुंफलेली आहेत .  या गुंफण्यातून अस्तित्वासाठीची आसक्ती बाळगून आहेत. 

भिन्न माध्यमे ,भिन्न स्थळे व काळही भिन्नच परंतु वैश्विक उर्जेने सगळ्या चित्रांना एकत्रित आणले आहे तरीही ती स्वतंत्रपणे अभिव्यक्त होत आहेत. स्वतःच्या दृष्टीपटलांतून संवेदना निर्माण  करीत आहेत. तीनही चित्रकारांनी अवकाश आणि  खोली यांचा विहंगम अनुभव बघणाऱ्यांना दिला आहे .


      अपूर्वा देसाई यांच्या कामावर | Recently work by   
                                Apruva Desai 

•अपूर्व देसाई. 

चित्रकला क्षेत्रात आपल्या कौशल्यपूर्ण माध्यमं आणि विषयाने स्वतः चे स्थान निर्माण केले आहे. औदयोगिक कामगारांचे भावविश्व त्याच्या माध्यमातून दर्शविले आहे. औदयोगिकतेने जन्मलेल्या युक्तीवादाला माध्यमाची योग्य जोड दिली आहे. वस्त्रकामगार आणि जहाजबांधनी करणारे कामगार हे  जी माध्यमे वापरतात किंवा ज्यात काम करतात तेच माध्यम उदा. मोठमोठ्या लोखंडी / अल्युमिनियम   वायर, जहाज कापताना बांधताना वापरला गेलेला पत्रा इत्यादी .

मेटल ,पत्रा यांचेतुकडे हे वापरून स्चनाकृती तयार करीत असताना अवकाशात अवकाश व त्यातून विविध आकार तयार होत 

 जातात. ते भाग एकमेकावर आच्छादित  (overlap) झाल्याने  निर्माण झालेली गती आणि झरोके यांनी एकमेकांना तोलून धरल्याचा आभास निर्माण होत आहे. त्याने निर्माण केलेल्या पूर्णाकृतीतून तयार झालेले कोन छोटी छोटी अवकाशे बघणाऱ्या च्या  संवेदनाना गती प्राप्त करून देतात आणि त्यांची विचारांची हष्टीपटलं कमी जास्त होऊ लागतात अचेतनेतून चैत्यन्यांचा भास पहाणारा अनुभवतो. चित्रकाराचे जीवन‌मान व वैचारिकता ही त्या गती व अवकाशात परावर्तित होत जाते . यातूनच कामगारांची स्वप्ने संघर्ष आकांक्षाना सछिद्रता मिळते आणि आपोआप पुर्णत्वाची गतीपूर्ण  होते. 

•हार्दिक कंसारा- (बडोदा) 

सर्व कलाकृती पाहताना एक ऑप्टीकल भ्रम तयार होत जातात पेपरवर केलेल्या क्राफ्टमनशीपने प्रेक्षक आणि कलाकृती याच्यात दृश्यात्मक परस्परसंवादाला चालना देण्याचे उद्धिष्ट साध्य होते.' स्थापत्य' हे त्याच्या चित्रांचे मुख्य अंग आहे त्या स्थापत्यातल्या अवकाश पोकळीतून तो प्रेक्षकांच्या  कल्पनांना / संवेदणांना सचेतन करण्याचा प्रयत्न करतो. बघणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीपटलाचे कंगोरे त्या ठिकाणी अनुभवता येतील. पेपर क्राफ्ट  मधून निर्माण केलेली खोली आणि घनता दृष्टीच्या  जडत्वाचा प्रवास सुरु करते. वास्तूंच्या उंची आणि घनतेने तयार झालेले खोलगट, पसरट स्थर त्यांवास्तूंची एकमेकांबद्दलची अनोखी संवेदना निर्माण करून एका वेगळ्या जगाचा भास निर्माण करून जातात. घनतेच्या जड्त्वाची अनुभूती ही माध्यमाच्या तरलतेला आव्हानात्मक प्रतिसादाने पूर्णत्वाकडे घेऊन जातात.

•चांदणी पासवान - हीच्या चित्रांमध्ये प्रकाश आणि सावली  यांचा मोहक खेळ हा कागद आणि कापडावर पहायला मिळतो. प्रत्येक पेन्टिंग मधून सुर्यप्रकाश परावर्तित होऊन पृथ्वी तत्वालाच अवकाश बनविल्याचा भास होतो. पंचमहाभूतांच्या असीम तत्वांना प्रत्येक चित्र स्पर्श करू पाहत आहे . प्रत्येकाने त्याची स्वतःची खिडकी उघडावी आणि जडत्वावर विसावलेल्या तरलतेला अनुभवाव .

या गडद भरगच्च जीवनसंघर्षातून स्वतःला काही काळ निरव शांततेची अनुभूती चित्रातील प्रत्येक खोली करून देत आहे. 

The sensation of aperture...

Curated by - Nilesh kinkale

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...