जहांगिर आर्ट मनिष सुतार यांचे सफरनामा हे चित्र प्रदर्शन I २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४

 

चित्रकारमनिष सुतार

सफरनामा

            मुंबईस्थित सुप्रसिद्ध चित्रकार मनिष सुतार ह्यांच्या जलरंगातील वैविध्यपूर्ण कलात्मकतेने नटलेल्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालनमुंबई ४००००१ येथे २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनातील चित्रे मानवी जीवनातील त्याच्या प्रवासातील अनेक भावपूर्ण कलात्मक पैलू दर्शवितात.

            मनिष सुतार ह्यांचे कलाशिक्षण BFA पर्यंत LS Raheja School of Arts बांद्रा मुंबई येथे झाले. त्यानंतर त्यांनी अनेक नामांकित कलादालनातून मुंबईपुणेहैदराबाद नवी दिल्ली न्यूयॉर्क बायनेल USA , तैपेई-तैवान वगैरे ठिकाणी एकल व सामूहिक कलाप्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे ठेवलीत.  त्यांच्या प्रदर्शनांना नेहमी रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पुणेहैदराबाद वगैरे ठिकाणी आयोजित आर्ट कॅम्प मध्ये त्यांनी भाग घेतला व त्यातून आपली कला सर्वांपुढे सादर केली. त्यांना अनेक मान्यवर संस्थांकडून बक्षिसे व पुरस्कार मिळालेत व मानमरातब ह्यांचा लाभ झाला. भारतात व विदेशात अनेक मान्यवर कलासंग्राहकांकडे त्यांची चित्रे मुंबईनवी दिल्लीबंगलोरकेनयाइंग्लंड, जर्मनीअमेरिकापॅरिसइटली वगैरे ठिकाणी संग्रही आहेत.  



            प्रस्तुत प्रदर्शनात ठेवलेली चित्रे मानवी आयुष्यात येणाऱ्या भावपूर्ण अनुभूती व तशा वैशिट्यपूर्ण कलात्मक संकल्पना ह्यावर आधारित आहेत. मुंबईसारख्या धकाधकीचे वातावरण लाभलेल्या महानगरात माणसाला पदोपदी करावा लागणारा संघर्षयेणारे सुखद व दुःखद अनुभवहर्षउल्हासउत्कंठाप्रतिक्षाउत्सुकता तसेच उदासीनतानैराश्य वगैरे भावनिक  संकल्पनांचे आणि त्यावरून मानवी जीवनात येणारी गतिमानता वगैरेंचा रम्य आविष्कार त्याने आपल्या तंत्रशुद्ध शैलीत येथे मांडला आहे. ह्यांचे सादरीकरण आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत येथे चित्रमाध्यमातून मनीष सुतार ह्याने फार कलात्मकतेने केले आहे. आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांवर तसेच स्वकीय संबंधितांशी निगडित अशा अनुभूतीवर आधारित त्याने आपला मनोहर व चित्ताकर्षक कलाविष्कार ह्या प्रदर्शनात रसिकजनांपुढे चित्रमाध्यमातून  सादर केला आहे.



चित्रकारमनिष सुतार

स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडामुंबई

कालावधी नोव्हेंबर ते  डिसेंबर २०२४

वेळसकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

जहांगिर आर्ट गॅलरीत पॉल डिमेलो यांचे “विस्मृतीतील पाने” (OBLIVION PAGES) हे एकल चित्र प्रदर्शन

 


वसई येथील सुप्रसिद्ध चित्रकार पॉल डिमेलो ह्यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, हिरजी गॅलरी महात्मा गांधी मार्गकाळा घोडामुंबई ४००००१ येथे २५ नोव्हेम्बर ते १ डिसेंबर २०२४ दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची जलरंग व ऍक्रिलिक रंग ह्या माध्यमांचा वापर करून साकारलेली पेपर आणि कॅनव्हासवरील चित्रे वसई आणि आसपासच्या परिसरातील अद्भुतरम्य निसर्गवैभवाचे व तेथील साध्य पण कलात्मक जीवनशैलीचे सर्वांना चित्रमय दर्शन घडवितात. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २५ नोव्हेम्बर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिरजी जहांगिर आर्ट गॅलेरी मुंबई येथे होणार असून त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  समीर साटा  - प्रोजेक्ट डायरेक्टररिलायन्स  इंडस्ट्री लि.मुंबईफादर ज्यो  अल्मेडाप्रिन्सिपलसेंट जोसेफ विदयालय व ज्यू. कॉलेजविरारविजयराज बोधनकर - नामवंत चित्रकार व पत्रकार आणि दत्तात्रय ठोंबरे , - प्रिन्सिपलवसई विकासिनी कलामहाविद्यालयवसई हजर राहतील - तसेच त्यावेळी अनेक कलाप्रेमीरसिक, कला संग्राहकप्रवर्तक वगैरेची  उपस्थिती राहील. वसईचा संपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा येथे मानस आहे.




चित्रकारपॉल डिमेलो


  पॉल डिमेलो  ह्याचे कलाशिक्षण BFA ( Applied  Art ) पर्यंत सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ एप्लाईड आर्टमुंबई येथे झाले. तत्पूर्वी त्यांनी तेथे diploma इन A.T.C. (photography)  हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध कलादालनातून आपल्या चित्रांचे एकल व सामूहिक प्रदर्शनातून सादरीकरण केले. ह्यात मुख्यतः जहांगीर आर्ट गॅलरीगॅलरी लीलानेहरू सेंटर आर्ट गॅलरीआर्ट एंट्रन्स गॅलरीआर्मि अँड नेव्ही बिल्डिंगआर्ट प्लाझा वगैरेचा समावेश होतो. तसेच त्यांनी नेहरू सेंटर वरळी येथे कलास्पंदन आर्ट फेअर  प्रबोधनकार आर्ट गॅलरीबोरीवली येथे कलाप्रदर्शननॅशनल पेंटिंग स्पर्धा व  वर्कशॉप - माउंट अबू राजस्थान व बुंदी राजस्थान येथेइंटेरनशनल वॉटरकलर सोसायटी इंडियाबिआनेल २०२२नवी दिल्लीपहिले ऑलिम्पि आर्ट -२०१९वॉटरकलर सोसायटी ऑफ इंडियानवी दिल्लीसहयोग सेंटर वसई येथे प्रदर्शन वगैरे ठिकाणी आपल्या चित्रांचे सादरीकरण केले. त्यांच्या चित्रांना नेहमी रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यांची चित्रे मुंबईदिल्लीकलकत्तालंडन ( यु. के. ) यु. एस. ए. वगैरे ठिकाणी मान्यवर संग्राहकांकडे संग्रही आहेत.   



                        प्रस्तुत चित्रप्रदर्शनात त्यांनी ठेवलेली  वैशिट्यपूर्ण  चित्रे प्रामुख्याने वसई परिसरातील सृष्टीसौंदर्य व निसर्गाचे अवर्णनीय भांडार ह्याचे चित्रमय दर्शन सर्वाना घडवितात. तेथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला व बालपण त्या परिसरात  गेल्यामुळे त्यांच्या मनातील त्या सुखद आठवणी आणि सध्या कालबाह्य होत असणारी काही जीवनमूल्ये ह्यांचे दर्शन येथे सर्वांना होते. तेथे बागायती शेतीची कामे करण्यासाठी लागणारी साधने व अवजारेबैलांचा वापर करून गळाकार चक्राच्या साहाय्याने (मोट ) विहिरीतून पाणी काढून ते शेतीसाठी उपयोगात आणणेजुनी कौलारू घरे व त्यांचे सौंदर्यतेथे फुलणारी विविध फुलेफळ फळावळसृष्टीसौंदर्यघरातील जुन्या वस्तू जसे जातेकंदीलकासंडीचरवीबैलजोडी इत्यादी चे एक नयनरम्य व विलोभनीय दर्शन सर्वांना येथे घडते. तेथील साधी पण कलात्मक जीवनशैलीवस्त्रप्रावरणे, सण समारंभउत्सव व त्यांचे लोकांतर्फे साजरे होणारे उत्कट रूप वगैरेचे मनोहर दर्शन सर्वांना होते. शेतीमाल बाजारात बैलगाडीत नेताना शेतकरी कुटुंबाची मानसिकता व उत्कटता तसेच  तत्परता वगैरे तेथील ग्रामीण परिसरातील सध्या जीवनशैलीचे  विविध पैलू त्यांनी आपल्या कलात्मक शैलीत येथे सादर केले आहे.     


चित्रकारपॉल डिमेलो

स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडामुंबई

कालावधी२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४

वेळसकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

मिस्टिक मंडलास आणि इमोशनल व्हॉर्टेक्स: आर्ट-नोव्हेंबर समुह कला प्रदर्शनाचे आयोजन मलाका येथे

 


रोमार्टिका
 आर्ट डिकोडेडने कोरेगाव पार्कपुणे येथील मालाका आर्ट गॅलरीमध्ये आर्ट-नोव्हेंबर ग्रुप शोचा दुसरा टप्पा सुरू केला आहेचित्रकला प्रदर्शनाची सुरुवात अनेक सनसनाटी कार्यक्रमांनी झाली. ‘आर्ट इज  जेलस मिस्ट्रेस’ या विषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले होतेज्यामध्ये पुणे आर्ट मूव्हमेंटचे संस्थापक श्रीअनुब जॉर्जमानसशास्त्रज्ञ डॉसुप्रिया ढोंगडेआयएसआयचे प्राध्यापक डॉअमित बिस्वास आणि लेखक सैकत बक्सी हे पॅनेल सदस्य होतेप्रख्यात कलाकार शरद तर्डे आणि सुचिता तर्डे यांनी श्रोत्यांना अमूर्त अभिव्यक्तीच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन केलेडॉअमित बिस्वास यांनी कला आणि गणित यांच्यातील संबंधांवर भाष्य केलेकलाकार सरन्या गांगुली यांनी लाइव्ह म्युझिकसह चित्रकला सादर केली

 


शोचे उद्घाटन डॉअमित बिस्वासविनायक भोरकडे - गोडरेज प्रॉपर्टीजचे मार्केटिंग प्रमुख आणि अबीरा आर्ट्सच्या संस्थापक स्वेता सिंग यांच्या हस्ते १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आलेहे प्रदर्शन ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पंधरा दिवसांसाठी खुले राहील

 

सात कलाकारांनी त्यांच्या अनोख्या शैली आणि आत्म्याचे प्रदर्शन केलेगौरांगी मेहता शाह यांच्या अभिव्यक्तिवादी मानवी आकृती गूढ आणि सणासुदीच्या वातावरणात आहेतपौलमी जगताप यांच्या अमूर्त अभिव्यक्ती भावनिक भोवऱ्याच्या फिरत्या स्ट्रोक्स आहेतगितांजली सेनगुप्ता यांच्या शांत लँडस्केप्स शांतता आणि शांततेच्या जगाची खिडकी उघडतातमानसी सुरेका यांच्या मंडलांमध्ये तेजस्वीविरोधाभासी ठिपक्यांसह गूढ लक्ष केंद्रित केले आहे जे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतातसुरमई मोगोडे यांच्या कॅनव्हासमध्ये अमूर्तता आणि भारतीय शास्त्रीय आत्म्याचे मिश्रण आहेनिकिता गर्ग यांच्या स्वच्छ लँडस्केप्समध्ये एक अद्भुत पारदर्शक आकर्षण आहे आणि अपराजिता अंबस्थ यांच्या विविध चित्रांमध्ये उज्ज्वल भविष्याचे आश्वासन आहेहे प्रदर्शन कला प्रेमींसाठी एक अद्भुत दृश्य मेजवानी आहे.


१६ ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत 


सहभागी कलाकार: मानसी सुरेकागौरांगी मेहता शाहसुरमाई मोर्गोडेपौलामी जगतापनिकिता गर्गगीतांजली सेनगुप्ताअपराजिता अंबास्था 

 

स्थळ:  मलाका  आर्ट गैलरीकोरेगाव पार्क, पुणे


 

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...