जहांगिर आर्ट मनिष सुतार यांचे सफरनामा हे चित्र प्रदर्शन I २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४

 

चित्रकारमनिष सुतार

सफरनामा

            मुंबईस्थित सुप्रसिद्ध चित्रकार मनिष सुतार ह्यांच्या जलरंगातील वैविध्यपूर्ण कलात्मकतेने नटलेल्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालनमुंबई ४००००१ येथे २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनातील चित्रे मानवी जीवनातील त्याच्या प्रवासातील अनेक भावपूर्ण कलात्मक पैलू दर्शवितात.

            मनिष सुतार ह्यांचे कलाशिक्षण BFA पर्यंत LS Raheja School of Arts बांद्रा मुंबई येथे झाले. त्यानंतर त्यांनी अनेक नामांकित कलादालनातून मुंबईपुणेहैदराबाद नवी दिल्ली न्यूयॉर्क बायनेल USA , तैपेई-तैवान वगैरे ठिकाणी एकल व सामूहिक कलाप्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे ठेवलीत.  त्यांच्या प्रदर्शनांना नेहमी रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पुणेहैदराबाद वगैरे ठिकाणी आयोजित आर्ट कॅम्प मध्ये त्यांनी भाग घेतला व त्यातून आपली कला सर्वांपुढे सादर केली. त्यांना अनेक मान्यवर संस्थांकडून बक्षिसे व पुरस्कार मिळालेत व मानमरातब ह्यांचा लाभ झाला. भारतात व विदेशात अनेक मान्यवर कलासंग्राहकांकडे त्यांची चित्रे मुंबईनवी दिल्लीबंगलोरकेनयाइंग्लंड, जर्मनीअमेरिकापॅरिसइटली वगैरे ठिकाणी संग्रही आहेत.  



            प्रस्तुत प्रदर्शनात ठेवलेली चित्रे मानवी आयुष्यात येणाऱ्या भावपूर्ण अनुभूती व तशा वैशिट्यपूर्ण कलात्मक संकल्पना ह्यावर आधारित आहेत. मुंबईसारख्या धकाधकीचे वातावरण लाभलेल्या महानगरात माणसाला पदोपदी करावा लागणारा संघर्षयेणारे सुखद व दुःखद अनुभवहर्षउल्हासउत्कंठाप्रतिक्षाउत्सुकता तसेच उदासीनतानैराश्य वगैरे भावनिक  संकल्पनांचे आणि त्यावरून मानवी जीवनात येणारी गतिमानता वगैरेंचा रम्य आविष्कार त्याने आपल्या तंत्रशुद्ध शैलीत येथे मांडला आहे. ह्यांचे सादरीकरण आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत येथे चित्रमाध्यमातून मनीष सुतार ह्याने फार कलात्मकतेने केले आहे. आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांवर तसेच स्वकीय संबंधितांशी निगडित अशा अनुभूतीवर आधारित त्याने आपला मनोहर व चित्ताकर्षक कलाविष्कार ह्या प्रदर्शनात रसिकजनांपुढे चित्रमाध्यमातून  सादर केला आहे.



चित्रकारमनिष सुतार

स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडामुंबई

कालावधी नोव्हेंबर ते  डिसेंबर २०२४

वेळसकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...