अँनाज..... स्प्रिंग फोर्थ
सुप्रसिद्ध चित्रकर्ती महुआ रे हिच्या नवनिर्मित कॅनव्हासवरील तैलचित्रांचे व ब्रॉन्झमधील शिल्पांचे एकल कलाप्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, डॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१८ येथे ३ ते ९ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात तिने ठेवलेली चित्रे व शिल्पाकृती तिच्या कल्पकतेचे व सौंदर्यदृष्टीचा वापर करून तयार केलेल्या अद्भुत भावनात्मक कलाकृतींचे वास्तववादी शैलीत सर्वांना दर्शन घडवितात.
![]() |
चित्रकर्ती : महुआ रे |
महुआ रे हिच्या कलाप्रवासाची सुरुवात तिच्या बालपणातील आईच्या सहवासात केलेल्या अवकाश निरीक्षणातून व अंतरिक्ष दर्शनातून झाली. त्यानंतर तिला विविध कलाकृती बघण्याचा व त्या कलाकारांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यात प्रामुख्याने शहाबुद्दीन, देवीप्रसाद रॉय चौधरी, जोगेन चौधरी, विनोद दुबे, अशोक भौमिक वगैरेंचा समावेश होतो. प्रसिद्ध कलाकार दुर्गाप्रसाद रॉय चौधरी ह्यांच्या हस्ते तिला आपल्या कलाजीवनाच्या सुरुवातीच्या कालखंडात मिळालेल्या पुरस्कारामुळे व उत्तेजनामुळे योग्य प्रेरणा मिळाली. तिने भारतातील व परदेशातील प्रमुख कलादालनातून एकल व सामूहिक प्रदर्शनातून आपल्या चित्रांचे व शिल्पांचे सादरीकरण केले. मुंबई, नवी दिल्ली, बंगलोर, गोवा, न्यूयॉर्क, कॅनडा, लंडन, पॅरिस, दुबई, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी तिच्या प्रदर्शनांना रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला व त्यामुळे कलाक्षेत्रात आणखी कलाकृती सादर करण्यासाठी योग्य उत्तेजन मिळाले. तिला अनेक भारतीय व विदेशी कलाप्रवर्तक संस्थांकडून पारितोषके मिळाली असून तिचा गौरव झाला आहे. अनेक मान्यवर कलासंग्राहकांकडे तिची कलारूपे संग्रही आहेत.
चित्रकर्ती - महुआ रे
नेहरू सेंटर कलादालन, डॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई
३ ते ९ डिसेंबर २०२४
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा