नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत निकिता अगरवाल हिचे एकल चित्र प्रदर्शन सुरु

 


चित्रकार: निकिता अग्रवाल

प्रसिद्ध चित्रकर्ती निकिता अग्रवाल हिच्या तैलरंग व ऍक्रिलिक रंगांचा वापर करून कॅनव्हासवर काढलेल्या वाराणशी व तेथील धार्मिक संकल्पना आणि वैशिट्यपूर्ण भावोत्कट वातावरण ह्यावर आधारित चित्रांचे एकल प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई ४०००१८ येथे 3 ते ६जानेवारी २०२५ ह्या दरम्यान सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. तिने आपल्या कलात्मक शैलीत बनविलेली ही चित्रे खरोखर प्रत्येक दर्शकाला आवडतील अशीच आहेत. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २ जानेवारी २०२५ रोजी नेहरू सेंटर येथे झाले. तिच्या प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रे वाराणशी शहरातील धार्मिक वातावरण, तेजाने प्रकाशित होणारे गंगा नदीचे घाट, त्यावरील जप तप, प्रार्थना व इतर संकल्पना तसेच तेथील मंदिर, तीर्थस्थाने, प्रार्थनास्थळे, विविध बोटी वगैरे दर्शवितात. ह्या ठिकाणी होणारे अखंड मंत्रजागर, पूजापाठ व रूढी/ परंपरांनुसार वारंवार होणारे धार्मिक विधी वगैरेचे त्यात उत्कटपणे सर्वांना दर्शन घडते. निळा, हिरवा, भगवा, लाल व नारिंगी तसेच पिवळा वगैरे रंगांच्या योग्य लेपनातून व अर्थपूर्ण संकल्पनातून तिने पारंपरिकता व आधुनिकता ह्याचा एक अप्रतिम समन्वय आपल्या तंत्रशुद्ध शैलीत चित्रमाध्यमातून येथे सादर केला आहे. तिचे प्रत्येक चित्र बोलके व वैशिट्यपूर्ण आणि कलात्मक आहे व त्यामुळे ते रसिकमनास भावते. अर्थात त्याला त्यामुळे दृश्यानंद व मानसिक शांती व समाधान ह्यांचा लाभ होतो.




सचिन अहिर, एमएलसी महाराष्ट्र यांनी नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे रिपल्स ऑफ रिफ्लेक्शनमध्ये भाग घेतला

चित्रकार: निकिता अग्रवाल
तारीख: ३ ते ६जानेवारी २०२५ ह्या दरम्यान
स्थळ: नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई ४०००१८
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अमिताभ अशेष यांचा 'युफिझम' – चित्रकलेतील नवा दृष्टिकोन जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन

चित्रकार  :  अमिताभ   अशेष आंतरराष्ट्रीय   ख्यातीचे   चित्रकार   अमिताभ   अशेष   यांचे  " युन   भि "  हे   नाविन्यपूर्ण   चित्रकला...