सिमरोझा आर्ट गॅलरीत कियान(KIAN) फाऊंडेशन द्वारा आयोजित शंपा सरकार दास यांच्या कलाकृतींचे 'भूमी' हे कला प्रदर्शन

 भूमी 

पुणे येथील कियान फाऊंडेशन द्वारा आयोजित शंपा सरकार दास या सुप्रसिद्ध चित्रकर्तीच्या कलाकृतींचे प्रदर्शन सिमरोझा आर्ट गॅलरी७२भुलाबाई देसाई मार्गब्रीच कँडीमुंबई४०००२६ येथे दिनांक २५ ते ३१ जानेवारी २०२५ या दरम्यान भरणार आहेते तिथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल

 

या प्रदर्शनाचे आयोजन कियान फाऊंडेशन तर्फे आरती नाईक यांनी केले आहे.


सिद्धार्थ नाईक 


आरती नाईक
   

सिद्धार्थ नाईक  आरती नाईक यांनी उदयोन्मुख  गुणवान कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या चित्रकलेच्या सादरीकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून त्याद्वारे त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यातील सूप्त कलागुणांना वाव देणे ह्या दृष्टीने या फाऊंडेशनची पाच वर्षांपूर्वी स्थापना केलीआजवर त्यांनी अनेक कलाप्रदर्शनेआर्टकॅम्पकार्यशाळाकलाप्रात्यक्षिके यांचे ठिकठिकाणी आयोजन केले आहेहोतकरू कलाकारांना त्यांची कला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर करण्याची संधी  प्रेरणा आजवर या संस्थेतर्फे दिली आहेअशा तऱ्हेने ह्या संस्थेने ह्या क्षेत्रात कलेच्या प्रसारासाठी आपले बहुमूल्य योगदान वेळोवेळी दिले आहेह्या उपक्रमांचा एक भाग म्हणून यांनी शंपा सरकार दास यांच्या कला कृतीचे प्रदर्शन सिमरोझा कलादालनमुंबई येथे आयोजित केले आहे.


 

शंपा सरकार दास हिचे कलाशिक्षण BFA (पेंटिंगपर्यंत कॉलेज ऑफ आर्ट नवी दिल्ली  MFA (पेंटिंगपर्यंत जामियामिलिया इस्लामिया येथे झाले.  भारतीय तत्त्वज्ञानसंस्कृतीधार्मिक संकल्पनापरंपरा तसेच रितीरिवाज या सर्वांचा प्रतिकात्मक समावेश करून तिने सादर केलेली चित्रे भारतीयत्वाचे द्योतक असणारी सहिष्णुता दर्शवतातह्या विविधलक्षी चित्रांमध्ये सौंदर्यपूर्ण संकल्पना  उचित रंगलेपणाबरोबर भावपूर्ण उत्कटता यांचा समावेश आहेतिने बऱ्याच नामवंत कलादालनातून देशविदेशात आपली चित्रे रसिकांसमोर मांडली असून त्या सादरीकरणास सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहेदक्षिण कोरियान्यूयॉर्कसॅनफ्रँसिस्कोशिकागोलंडनव्हिएतनामसिंगापूर वगैरे ठिकाणी तिने चित्रांची प्रदर्शने भरून रसिकांची वाहवा मिळवली असून बऱ्याच नामवंत संग्राहकांकडे तिची चित्रेसंग्रही आहेतअनेक मानसन्मान तिला लाभले आहेत.


 

प्रस्तुत प्रदर्शनात शंपा सरकार दास यांची ठेवलेली विविधलक्षी चित्रे भारतीय संस्कृतीतिची गौरवशाली परंपरा

धार्मिक संकल्पनारीतीरिवाजरूढी याबरोबरच मानवी जीवनात असणारे निसर्गाचे महत्त्वत्याची अनेक ऋतूतील रम्यरूपेयांचे आकर्षक दर्शन सर्वांना घडवतातत्याचबरोबर ती चित्रे मानव  जीवन ह्यातील अतूट नाते आणि त्याच्या अनेक भावपूर्ण छटा फार उत्कटपणे दर्शवतात.

 


अधिक माहितीसाठी संपर्क :

कियान फाऊंडेशन, E-18, वर्षा पार्कबाणेर रोडपुणेमहाराष्ट्रभारत ४११०४५

संपर्कआरती नाईक - ७३७८७७००५७

ईमेलaarti@kianfoundation.com



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...