जहांगीर आर्ट गॅलरीत अजित देसवंडीकर यांचे 'अर्बन व्हिस्पर्स’ हे एकल चित्र प्रदर्शन

 

चित्रकार; अजित देसवंडीकर


सुविख्यात चित्रकार अजित देसवंडीकर यांच्या तैलरंगातील  नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे ११ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भरणार आहेते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल.


या प्रदर्शनाचे उद्घाटन ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी  वाजता जहांगीर कलादालनात मान्यवर प्रमुख अतिथी श्रीप्रकाश बाळ जोशी यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी डॉसंजय भिडेश्री अलेक्झांडर पर्मीनोवश्री जीझस अलेजांड्रो डी ला रोसाश्री ग्रॅहॅम लंडनश्रीमती फिओना ग्रॅहॅम राऊस आणि श्रीमती सरला एनह्या कलाक्षेत्रातील मान्यवर अतिथींसह  रसिककलाप्रेमी  कलासंग्राहक यांची उपस्थित राहील



ह्या प्रदर्शनात अजि`त देसवंडीकर यांनी ठेवलेली तैलरंगाच्या  कलात्मक अर्थपूर्ण लेपनातून निर्मिलेली नागरी जीवनातील गतिमानता  अर्थपूर्ण कुजबुज तसेच तत्सम संकल्पना दर्शविणारी अनेक लक्षवेधी चित्रे सादर करण्यात आली आहेत.

अजित देसवंडीकर यांचे कलाशिक्षण मुंबईतील सर जे.जेस्कूल ऑफ आर्ट येथे झालेतेथे त्यांनी १९९४ साली BFA  १९९६ साली MFA या चित्रकलाक्षेत्रातील पदव्या संपादन केल्यावर आपली कलानिर्मिती सुरू केली  भारतातील तसेच परदेशातील अनेक प्रथितयश कलादालनातून आपल्या कलात्मक चित्रांचे एकल आणि सामूहिक कलाप्रदर्शनाद्वारे सादरीकरण केलेविद्यार्थीदशेत  त्यानंतरही त्यांना अनेक मान्यवर कलाप्रवर्तक संस्थांकडून पुरस्कार देऊन वेळोवेळी गौरविले गेले आहेत्यांच्या चित्रप्रदर्शनांना नेहमी रसिकजनांचा  कलाप्रेमींचा तसेच कलासंग्रहकांचा उदंड  सकारात्मक प्रतिसाद लाभला आहेत्यांची अर्थपूर्ण  कलात्मक चित्रे जगभरातील अनेक मान्यवर  सुप्रसिद्ध संग्राहकांकडे आहेत




प्रस्तुत प्रदर्शनात अजित देसवंडीकर यांनी ठेवलेली चित्रे एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित आहेतमुंबई  त्यासारख्या महानगरात आढळणारी गतिमानतासंघर्षतेथे जगण्यासाठी होणारे प्रयत्नसामाजिक जीवन आणि शहरी वातावरणातील जीवघेणी स्पर्धा  जगण्याची अहमहमिका यांचे एक भावपूर्ण  उत्कट दर्शन त्यांच्या चित्रातून घडवितातत्यांनी तैलरंगाचा कलात्मक  अर्थपूर्ण वापर करून आपल्या तंत्रशुद्ध वास्तववादी शैलीत निर्मिलेली ही विविधतेची चित्रे सर्व अपेक्षित दृश्यपरिणाम फार प्रभावीपणे दर्शवतातरिक्षाचालकविक्रेतेलोकल प्रवासातील दाटीवाटी  जीवघेणा संघर्षडबेवालेगर्दीची मानसिकताउत्तुंग इमारती  विविध ठिकाणी आढळणारी गर्दी  त्या बिकट आणि कठीण परिस्थितीवर मात करून आपला मार्ग सुखकर करण्याची सामान्य नागरिकांची मानसिकता  उत्कटता वगैरे दृश्यपरिणाम त्यांनी आपल्या चित्रमाध्यमातून एका विशिष्ट शैलीत रसिकांपुढे येथे सादर केले आहेतपारंपरिक जीवनशैली  आधुनिकता यांचा कलात्मक समन्वय येथे त्यांनी साधला असून बदलत्या काळानुसार शहरी वातावरणात गतिमान जीवन जगताना मानवी मनाचे  एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचे होणारे परिवर्तन आणि त्यात संभावणारे विविधलक्षी वेगवेगळे  बदल यांचे एक बोलके  आकर्षक तसेच अर्थपूर्ण दर्शन त्यांनी आपल्या चित्रांमधून सर्वांना घडवले आहे

 

चित्रकार; अजित देसवंडीकर

११ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत

जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडा, मुंबई 

 

११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत

 

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९३२२२३४०५७




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...