नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत ‘आर्ट कॉन्टीनम’ या समूह प्रदर्शनाचे आयोजन

 


२५ समकालीन, प्रतिथयश कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश 

 

आर्टिव्हल फाउंडेशन तर्फे दि ११ ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ‘आर्ट कॉन्टीनम’ या समूह प्रदर्शनाचे आयोजन नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई ४०००१८ येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनामध्ये मोहन नाईक, प्रदीप सरकार, कप्पारी किशन, भिवा पुणेकर, शशिकांत पाताडे, चंद्रकांत तजबिजे, निलेश दादा  निकम, रविंद्र तोरवणे, पारस परमार, ममता बोरा, डॉ. शेफाली भुजबळ, प्रविण उटगेएच आर दासदिपक गरुड, दामोदर मडगावकर, राखी शाह,  मोहित नाईक, जयश्री सवानी, मेधा नेरुरकर, कुरेश  बसराई, मिता व्होरा, तसनिम जमाल सोना,  सीमा शाह, शैलेश गुरव आणि पानेरी पुणेकर या २५ समकालीन, प्रतिष्ठित कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला आहे.


हे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन असून या प्रदर्शनात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, बंगलोर, हैदराबाद, कर्नाटक, गोवा, कोलकाता येथील कलाकारांचा सहभाग आहे. 

  

या कलाप्रदर्शनात निसर्गचित्रेव्यक्तीचित्रेवास्तवदर्शी चित्रेऐतिहासिक परंपरावारसा व संस्कृतीविशेष दाखवणारी चित्रेधार्मिक संकल्पनांवर आधारित पारंपारिक चित्रेआधुनिक आणि अमूर्त जीवनातील वास्तव दर्शवणाऱ्या अनेक शिल्पाकृती ठेवण्यात येणार आहेतचित्रे तैलरंगजलरंग, एक्रि्लिक, मिक्स मिडियाचारकोल या माध्यमातील असून शिल्पाकृती ब्रॉन्झ, फायबर, मिक्स मिडिया मधील  आहेत.  या प्रदर्शना  जवळजवळ ६० कलाकृती  एकाच छताखली रसिकांना बघता येतील.

 


या प्रदर्शनाचे आयोजन शरद गुरवसतीश पाटील यांनी केले आहे

 

ग्रामीण आणि शहरी भागातील नवोदितसमकालीन कलाकरांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणे हा आर्टीव्हल फाउंडेशनचा उद्देश आहे. ‘आर्ट कॉन्टीनम’ हे प्रदर्शन याच प्रयत्नांचा एक भाग आहे. कला रसिकांनी चुकवू नये असेच हे प्रदर्शन आहे.

`

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...