जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार निलेश दादा निकम यांचे इनर ट्रँकीलिटी (Inner Tranquility) हे चित्र प्रदर्शन

 

चित्रकार : निलेश दादा निकम 

 सुप्रसिद्ध चित्रकार निलेश दादा निकम ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे इनर ट्रँकीलिटी’ हे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई येथे २० ते २६ जानेवारी २०२५ ह्या दरम्यान भरणार आहेतें तेथे सर्वांना रोज सकाळी ११ तें संध्याकाळी  ह्या कालावधीत विनामूल्य बघता येईल.


निलेश निकम यांचे कलाशिक्षण रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये झाले असून, जेजेस्कूल आर्टस मधून त्यांनी टीडीही पदवीका मिळवली आहे आजवर त्यांच्या चित्रांची १० एकल प्रदर्शने भरली आहेतमुंबईठाणेपुणेवसईगोवाचंदिगढनवी दिल्ली आणि दुबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या ४५ समूहचित्रप्रदर्शनांत त्यांनी सहभाग घेतला आहेयाआधीच्या कलाकृतीही 'ध्यानधारणे'वरच आधारित असून मानवी जीवन सुंदर व्हावेहा त्यांच्या चित्रनिर्मितीचा ध्यास आहे. 

 

विरार येथील प्रसिद्ध चित्रकार निलेश निकम यांची चित्रे अशाच एकाग्रचित्तावर भाष्य करणारी आहेतध्यानधारणेचं महत्त्व सांगणारी आहेत.

 

आपल्या आयुष्यातील एक दिवस वाईट जातोखरंतरतो एक अपघात असतोपण सकारात्मक एनर्जी मिळवण्यासाठी एकाग्र झाल्यास ती साधना आपल्याला मनःशांती देणारी ठरू शकतेत्यासाठी कुठेतरी एकाग्रचित्ताने पाहण्याची गरज असतेत्या एकाग्रतेचे महत्त्व सांगणाऱ्याध्यानसाधनेतून मनःशांती मिळवण्याचा विश्वास जागवणाऱ्या निलेश निकम यांच्या कलाकृती आहेतहा चित्राविष्कार योगसाधनेतील त्राटकावर आधारलेला आहेतया योगसाधनेत चिन्हचित्रमूर्तीवर्तुळबिंदूज्योतसूर्य किंवा चंद्र याकडे एकटक पाहत राहायचेएकाग्र व्हायचेआपल्या भरकटलेल्या मनाला स्थिर करायचेत्यातून आपल्याला मनःशांतीचा अनुभव येत असतोया त्राटक योगसाधनेनुसार निलेश निकम यांनी वेगवेगळ्या प्रतिमांचे कोंदण करूनत्यात चित्ररसिकांना गुंतवूनध्यानधारणेकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.


 

निलेश यांनी चित्रात मोठ्या वर्तुळातून छोट्याछोट्या वर्तुळांची निर्मिती केलीया वर्तुळांत आपली नजर त्या छोट्याछोट्या वर्तुळात गुंतत जाते आणि शेवटी त्याच वर्तुळातील एका छोट्या बिंदूवर स्थिरावतेकेंद्रित होतेत्या बिंदूवर आपली नजर स्थिरावली कीआपल्या मनातील विचार वर्तुळाच्या परिघाबाहेर फेकले जातातमनातल्या विचारांची

 

गर्दी संपली कीआपोआपच एक स्वच्छ रितेपण आपले मन शांत करत असतेस्थिर करत असते.


निकम यांनी वर्तुळांसोबतच कासवकमळबेलपानशंखडमरुलक्ष्मीची पावलंपिंपळाचं पानसूर्यचंद्र अशा काही पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या प्रतिमांचाही वापर केला आहेप्रत्येक माणसाची श्रद्धास्थानेस्फूर्तिस्थळेस्मृतिचिन्हे आणि प्रेरणास्थळेही वेगवेगळी असतातत्यानुसारनिलेश यांनी या प्रतिमांचा वापर केला आहेप्रत्येकाने त्याच्या श्रद्धेनुसार प्रतिमा निवडल्यातरी कलाकाराचा उद्देश रसिकांनी एकाग्र व्हावेगुंतावे हाच आहे.

 

या ध्यानधारणेसाठी चित्रच असावीतअसा निकम यांचा आग्रह नाहीघरात असलेल्या कुठल्याही वस्तूकडेप्रतिमेकडेचित्राकडे पाहून ही साधना करता येतेहेही त्यांना सुचवावेसे वाटतेया साधनेचे महत्त्व सांगण्याचे काम त्यांच्या कलाकृतींनी केले आहेचित्र हे मानवी मनाला आनंद देतातविचार करायला लावतातज्ञान देणारी असतातनिकम यांची चित्रं ध्यानधारणेचं ज्ञान देणारी आहेतरसिकांना प्रेरणा देणारी आहेतमनःशांती मिळवण्यासाठी चालवलेली एक चळवळ आहेध्यानधारणेची संकल्पना रुजवण्यासाठी साकारलेली ही चित्रे आहेतत्यासाठी त्यांनी यशाचे प्रतीक असलेल्या गोल्डन,सिल्व्हर आणि ब्रॉण्झ या रंगांचा खुबीने वापर केला आहे.



आयुष्यातील प्रवासात वेगवेगळे अनुभव येत असतातकाही अपघात होत असतातकाही क्लेषकारक घटना घडत असतातत्यातूनबाहेर पडण्यासाठी आपले मन सैरभैर  होतात्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळवणे महत्त्वाचे असतेत्यासाठी काही ध्यानधारणेचे प्रयोग आपल्याला मनःशांती मिळवण्याची ऊर्जा देत असतातही ऊर्जा मिळवण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या निकम यांच्या या चित्रकलाकृती आहेत.


चित्रकारनिलेश दादा निकम 

जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई 

२० ते २६ जानेवारी २०२५

सकाळी ११ ते सायंकाळी  वाजेपर्यंत 


द बॉम्बे आर्ट सोसायटीत स्वरंग आर्ट इनिशिएटिव्ह आणि कांचन तोडी यांच्या 'कॉस्मिक इम्प्रिंट्स' या प्रदर्शनाचे उद्घाटन

 कांचन तोडी 

स्वरंग आर्ट इनिशिएटिव्हच्या उद्घाटनानिमित्तआम्ही अभिमानाने सादर करतो, प्रसिद्ध चित्रकर्ती कांचन तोडी यांच्या अप्रतिम कलाकृतीज्या अध्यात्मभावना आणि सर्जनशीलता यांचा अद्वितीय संगम दर्शवतात.'कॉस्मिक इम्प्रिंट्सया त्यांच्या एकल प्रदर्शनाचे उद्घाटन १०  ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी .३० या वेळेत बॉम्बे आर्ट सोसायटीवांद्रे येथे होणार आहे.  

स्वरंग आर्ट इनिशिएटिव्हचा उद्देश कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आहेकांचन तोडीविक्रांत शिटोळे (प्रतिष्ठित कलाकारआणि आशिष रेगो (प्रख्यात संगीतकारयांच्या सहकार्याने स्थापन झालेला हा उपक्रम कला आणि सर्जनशीलतेला एक नवे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहेस्वरंग आर्ट इनिशिएटिव्ह ही केवळ एक संस्था नाहीतर भारतीय कलेला जागतिक स्तरावर नेणारी चळवळ आहेभारतीय कलाकारांना एकत्र आणूनशिक्षणसर्जनशीलता आणि नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचे स्वरंगचे स्वप्न आहे. "स्वा : रंगहे नाव स्वतःतच एक संकल्पना आहे कलाकारांच्या आवाजाला आणि अभिव्यक्तीला जागतिक पातळीवर पोहोचवणारा एक पूल.


 

स्वरंग आर्ट इनिशिएटिव्ह आणि कांचन तोडी यांच्या 'कॉस्मिक इम्प्रिंट्सप्रदर्शनाचे उद्घाटन १० जानेवारी २०२५ रोजी  सायंकाळी 4.30 वाजता प्रमुख पाहुणे श्रीराज नायर (व्ही एच पी - प्रवक्ते ) आणि श्री नीरज अगरवाल  (अतिरिक्त महासंचालक – दूरदर्शन)श्रीमती कुमारी यांच्यासह अपर्णा मयेकर (प्रसिद्ध गायिका)सुश्री इरावती हर्षे (अष्टपैलू अभिनेत्री)श्री अजय कौलश्रीमती रती हेगडेश्री अजय डेश्री नवीन अगरवाल आणि श्री संजय अरोरा यांच्या उपस्थितीत होईलकला आणि सर्जनशीलतेशी त्यांचा संबंध या कार्यक्रमाला एक अनोखा आयाम जोडेल.

स्वरंगचे दीर्घकालीन उद्दिष्ट:  

भारतीय कलेच्या वैभवाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कलाकारांना एक अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करून देणेपारंपरिक कलेचा सन्मान राखून आधुनिकतेशी पूल बांधण्याचा आमचा प्रयत्न आहेकलाकारांच्या अद्वितीय दृष्टीकोनाला साद घालतप्रेक्षकांना त्यामध्ये गुंतवून ठेवण्याचे हे महत्त्वाकांक्षी व्यासपीठ आहे.

 



कांचन तोडी यांचा जीवनप्रवास त्यांच्या कलाकृतींमध्ये प्रकट होतो. 1974 साली जन्मलेली कांचनएक आत्म-शिकलेली कलाकार असून त्यांच्या कलेत अध्यात्मस्त्री शक्तीआणि आत्मिक प्रवासाची छटा दिसून येतेत्यांनी साकारलेल्या 'सॅक्रेड फेमिनिन रायझिंग'वूम्ब जर्नी','फ्लाईट ऑफ सोल', आणि 'सोल एव्होल्यूशनया मालिकांमध्ये रंगटेक्सचर आणि आकारांचा अद्भुत संगम आहे.  

 

त्यांच्या ' कांचन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबईतील दुर्बल घटकांना मानसिक आरोग्याचे समर्थनमहिलांना रोजगार शिक्षण यांसाठी कार्य केले आहेअबू धाबीतील स्वामीनारायण मंदिरातही त्यांच्या कलाकृतींना मान्यता मिळाली आहे.  

 

या कार्यक्रमामध्ये मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते स्वरंग आर्ट इनिशिएटिव्हचे लोगो अनावरणकांचन तोडी यांच्या कलादालनाचे उद्घाटनतसेच त्यांच्या 'कॉस्मिक इम्प्रिंट्समालिकेबद्दल चर्चा होईल.  

 

कलाक्षेत्राला नव्याने आकार देण्याचा स्वरंग आर्ट इनिशिएटिव्हचा प्रवास हा प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायक ठरेलआपणही या ऐतिहासिक क्षणाचा भाग व्हा.  

 

स्वरंगआर्ट इनिशिएटिव्ह कलाकलाकार आणि सर्जनशीलतेच्या प्रवाहाला प्रोत्साहन देणारे एक अद्वितीय 

व्यासपीठ.




स्वरंग आर्ट इनिशिएटिव्ह आणि कांचन तोडी यांचे चित्र प्रदर्शन

कालावधी१० ते १२ जानेवारी २०२५

स्थळ : बॉम्बे आर्ट सोसायटीकेसीमार्ग, (रंगशारदा समोर), बांद्रा (पश्चिम), मुंबई 

वेळसकाळी ११ ते सायंकाळी .३० या वेळेत 

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत निकिता अगरवाल हिचे एकल चित्र प्रदर्शन सुरु

 


चित्रकार: निकिता अग्रवाल

प्रसिद्ध चित्रकर्ती निकिता अग्रवाल हिच्या तैलरंग व ऍक्रिलिक रंगांचा वापर करून कॅनव्हासवर काढलेल्या वाराणशी व तेथील धार्मिक संकल्पना आणि वैशिट्यपूर्ण भावोत्कट वातावरण ह्यावर आधारित चित्रांचे एकल प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई ४०००१८ येथे 3 ते ६जानेवारी २०२५ ह्या दरम्यान सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. तिने आपल्या कलात्मक शैलीत बनविलेली ही चित्रे खरोखर प्रत्येक दर्शकाला आवडतील अशीच आहेत. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २ जानेवारी २०२५ रोजी नेहरू सेंटर येथे झाले. तिच्या प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रे वाराणशी शहरातील धार्मिक वातावरण, तेजाने प्रकाशित होणारे गंगा नदीचे घाट, त्यावरील जप तप, प्रार्थना व इतर संकल्पना तसेच तेथील मंदिर, तीर्थस्थाने, प्रार्थनास्थळे, विविध बोटी वगैरे दर्शवितात. ह्या ठिकाणी होणारे अखंड मंत्रजागर, पूजापाठ व रूढी/ परंपरांनुसार वारंवार होणारे धार्मिक विधी वगैरेचे त्यात उत्कटपणे सर्वांना दर्शन घडते. निळा, हिरवा, भगवा, लाल व नारिंगी तसेच पिवळा वगैरे रंगांच्या योग्य लेपनातून व अर्थपूर्ण संकल्पनातून तिने पारंपरिकता व आधुनिकता ह्याचा एक अप्रतिम समन्वय आपल्या तंत्रशुद्ध शैलीत चित्रमाध्यमातून येथे सादर केला आहे. तिचे प्रत्येक चित्र बोलके व वैशिट्यपूर्ण आणि कलात्मक आहे व त्यामुळे ते रसिकमनास भावते. अर्थात त्याला त्यामुळे दृश्यानंद व मानसिक शांती व समाधान ह्यांचा लाभ होतो.




सचिन अहिर, एमएलसी महाराष्ट्र यांनी नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे रिपल्स ऑफ रिफ्लेक्शनमध्ये भाग घेतला

चित्रकार: निकिता अग्रवाल
तारीख: ३ ते ६जानेवारी २०२५ ह्या दरम्यान
स्थळ: नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई ४०००१८
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत


नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...