![]() |
चित्रकर्ती: निकिता अगरवाल |
सुप्रसिद्ध चित्रकर्ती निकिता अगरवाल हिच्या तैलरंग व अॅक्रिलिक रंगांचा वापर करून कॅन्व्हासवर काढलेल्या अमूर्त शैलीतील कलाकृती आणि वाराणसी व तेथील धार्मिक संकल्पना यावर आधारित चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे ११ ते १६ मार्च २०२५ या कालावधीत भरणार आहे. निकिता यांच्या प्रस्तुत प्रदर्शनात यांनी आत्मा, अवकाश आणि आत्म्याच्या प्रवासाचे सार आपल्या चित्रातून दाखवत आहे. तिच्या मिश्र माध्यमातील रचना, अमूर्तता आणि स्वरूप यांच्यातील रेषा, भावनिक रंग, पॅलेट सह वास्तु शिल्पीय स्मारकांना वेळेत टिपतात. प्रदर्शनातील काही चित्रे वाराणसी शहरातील धार्मिक वातावरण, तेजाने प्रकाशित होणारे गंगा नदीचे घाट, त्यावरील जप तप, प्रार्थना व इतर संकल्पना तसेच तेथील मंदिर, तीर्थस्थाने, प्रार्थना स्थळे, विविध बोटी वगैरे दर्शवितात. या ठिकाणी होणारे अखंड मंत्र जागर, पूजापाठ व रूढी/ रंपरानुसार वारंवार होणारे धार्मिक विधी वगैरेचे त्यात उत्कंठपणे सर्वांना दर्शन घडते. निळा, हिरवा, भगवा, लाल व नारिंगी तसेच पिवळा वगैरे रंगांच्या योग्य लेपनातून व अर्थपूर्ण संकल्पनातून तिने पारंपरिकता व आधुनिकता याचा एक अप्रतिम समन्वय आपल्या तंत्रशुद्ध शैलीत चित्र माध्यमातून येथे सादर केला आहे.
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: ११ ते १६ मार्च २०२५
वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत
for PR Contact
Webiste:www.artcirclemedia.com
Email: sharadpro77@gmail.com,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा